IMPIMP

Sanjay Raut | अमृता फडणवीसांच्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘वहिनीसाहेबांचा आग्रह असेल तर…’

by nagesh
Amruta Fadnavis | devendra fadnavis wife amruta fadnavis replied to sanjay raut over his statement on middle class man

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Sanjay Raut | गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात शिवसेना आणि भाजप (Shiv Sena And BJP) यांच्यात सतत खडाजंगी दिसून येत आहे. दोन्ही पक्ष परस्पर आरोप करताना दिसतात. यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) देखील शिवसेनेवर जोरदार टीका करताना पाहायला मिळते. नुकतंच अमृता फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर आता संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नागपूरातील शिवसंपर्क अभियानाच्यानिमित्ताने अमृता फडणवीस यांनी त्यांना एक खास आग्रह केला होता. पत्रकारांनी अमृता फडणवीस यांना राऊतांच्या नागपूर दौऱ्यावर प्रतिक्रिया विचारली तेव्हा अमृता फडणवीस यांनी म्हटले की, ”नागपुरी सावजी (मटण) नक्की खाल, हे मी त्यांना सजेस्ट करु शकते.” यानंतर आता संजय राऊत यांनी हसतहसत अमृता वहिनींचा हा आग्रह मान्य केला. ”वहिनीसाहेबांचा आग्रह आहे तर वहिनीसाहेबांचा हा आग्रह आम्ही पाळू,” असे राऊत म्हणाले.

 

दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यात आजपासून शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात होतेय. त्यासाठी शिवसेनेचे सर्व खासदार आजपासून 3 दिवसांच्या विदर्भ, मराठवाडा दौऱ्यावर असतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी 2 दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार आणि जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी भक्कम करण्याचा इरादा जाहीर केला होता. त्यासाठी शिवसंपर्क अभियान राबवले जात आहे. यानूसार आता प्रथम विदर्भ, मराठवाड्यात शिवसंपर्क अभियान राबवले जाणार आहे.

 

Web Title :- Sanjay Raut | shivsena leader and mp sanjay raut on amruta devendra fadnavis statement about saoji mutton nagpur

 

हे देखील वाचा :

Samantha Ruth Prabhu Bralette Photo | समंथाने घातली अत्यंत छोटी ‘ब्रा’, बोल्डनेसनं सोशल मीडियावर लावली आग

Narayan Rane | नारायण राणेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा; मुंबई उच्च न्यायालयानं दिला हा निर्णय

DCP Saurabh Tripathi | वसुली प्रकरणात IPS अधिकारी सौरभ त्रिपाठी निलंबित

Vitamin D Deficiency | शरीरात ‘व्हिटॅमिन-डी’ची कमतरता ‘या’ मोठ्या आजाराला देऊ शकते निमंत्रण, 6 सुपर फूड्सचा आजच डाएटमध्ये करा समावेश

 

Related Posts