IMPIMP

Satara News | पुण्यात येताना आणेवाडी टोल नाक्यावर स्वाभिमानीचा ठिय्या आंदोलन

by nagesh
Satara News | Self-respect protest at Anewadi toll booth while coming to Pune

सातारा : सरकारसत्ता ऑनलाईन  – Satara News | पुण्यातील साखर संकुल (Sakhar Sankul Pune) येथे घेराव आंदोलनासाठी येणार्‍या स्वाभिमानी संघटनेच्या (Swabhimani Sanghatana) गाड्या सोडण्यास नकार दिल्याने पुण्याऐवजी आणेवाडी टोलनाक्यावर आंदोलन करण्याची वेळ स्वाभिमानी संघटनेवर आली. (Satara News)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुण्यात स्वाभिमानी संघटनेकडून साखर संकुल येथे घेराव आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनासाठी स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या अनेक गाड्या कोल्हापूरहून पुण्याकडे येत होत्या. शेतकरी (Farmer) आंदोलकांच्या गाड्यांना टोल माफ केल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार कोल्हापूरहून पुण्याकडे येतानाच्या टोल नाक्यांवर टोल आकारण्यात आला नव्हता. मात्र, या गाड्यांना सोमवारी सकाळी आणेवाडी टोल नाक्यावर अडविण्यात आले. टोल भरण्यास त्यांना सांगण्यात आले. विना टोल गाड्यास सोडण्यास नकार दिल्याने कार्यकर्त्यांनी टोल नाके बंद पाडले.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मेळाव्यास टोल माफी मग शेतकर्‍यांना का नाही, अशी विचारणा शेतकरी करत होते. त्यामुळे नाक्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या सुमारे ५ किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. (Satara News)

टोल प्रशासनाने प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालंधर पाटील (Jalandhar Patil) यांच्याशी चर्चा केल्यानंतर गाड्या
सोडण्यास सुरुवात केली आहे. आता हळूहळू वाहतूक सुरळीत होत आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Satara News | Self-respect protest at Anewadi toll booth while coming to Pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मोफत साड्यांचा मोह 2 ज्येष्ठ महिलांना पडला महागात; सिंहगड रोड आणि पाषाण परिसरातील घटना

Retired ACP Subhaschandra Dange Passes Away | सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुभाषचंद्र डांगे यांचे निधन

Janhvi Kapoor | जान्हवी कपूरने बॉयफ्रेंड ओरहान विषयी केले ‘हे’ मोठे वक्तव्य; म्हणाली…..

 

Related Posts