IMPIMP

Satara Police | दुर्देवी ! दीडच वर्षापुर्वी विवाह झालेल्या 29 वर्षीय पोलिसाचा हार्ट अटॅकने मृत्यू

by nagesh
Satara Police | A 29-year-old policeman who got married a year and a half ago died of a heart attack

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन Satara Police | सातारा जिल्हा पोलिस दलातील (Satara Police) 29 वर्षीय निलेश गौतम बच्छाव ( Nilesh Gautam Bachhav) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाला आहे. पीटी परेड झाल्यानंतर अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले यानंतर त्यांना खासगी रुग्णालामध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा दीड वर्षापूर्वी विवाह झाला होता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, निलेश बच्छाव हे काल नेहमीप्रमाणे पोलिस कवायत मैदानावर (Satara Police) पीटी परेड (PT Parade) करण्यासाठी पहाटे 6 वाजता गेले होते.
सकाळी 8 वाजता परेड झाल्यानंतर त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले.
यानंतर त्यांना उपचारासाठी साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यानंतर आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

 

निलेश बच्छाव यांचे निधन झाल्याचे कळताच त्यांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.
निलेश बच्छाव यांनी आतापर्यंत पोलिस मुख्यालय, बॉडीगार्ड म्हणून सेवा बजावली आहे.
सध्या ते दहशतवादी विरोधी पथकामध्ये (ATS) मागच्या 3 वर्षापासून सेवा बजावत होते.
निलेश बच्छाव यांच्या माघारी आई, वडील आणि पत्नी असा परिवार आहे.
निलेश यांचे दीड वर्षापूर्वीच लग्न झाले होते. निलेश बच्छाव यांच्या अचानक जाण्याने सातारा पोलिस दलात (Satara Police) हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Satara Police | A 29-year-old policeman who got married a year and a half ago died of a heart attack

 

हे देखील वाचा :

Sourav Ganguly | सौरव गांगुलीला ICC मध्ये मिळणार मोठी जबाबदारी ! जाणून घ्या दादाच्या नव्या ‘इनिंग’बाबत

Modi Government | दररोज 7 रूपयांची बचत करून दरमहा मिळवा 5000 रूपये, जाणून घ्या मोदी सरकारची ‘ही’ जबरदस्त स्कीम

Sameer Wankhede | NCB अधिकारी समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम? उच्च न्यायालयात कागदपत्रे दाखल

 

Related Posts