IMPIMP

SBI Savings Fund | SBI सेव्हिंग फंडमध्ये करा गुंतवणूक, 5 वर्षात मिळेल 37% पेक्षा जास्त रिटर्न; जाणून घ्या

by nagesh
State Bank of India (SBI) | sbi now pension slip and balance details will be available on whatsapp know how

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाSBI Savings Fund | जेव्हा गुंतवणुकीतून कमाईची बाब येते, तेव्हा प्रत्येकाला कमी वेळेत जास्त नफा मिळवायचा असतो. अल्पावधीत चांगल्या रिटर्नसाठी लोक म्युच्युअल फंडांवर (Mutual Funds) अवलंबून असतात. जिथे कमी कालावधीत चांगला नफा मिळतो (Best Returns On Mutual Funds). बाजारात अनेक प्रकारचे म्युच्युअल फंड आहेत. जिथे कमी कालावधीत चांगला रिटर्न मिळत आहे. मात्र, कोणत्याही फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी काही संशोधन करणे आवश्यक आहे. (SBI Savings Fund)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

तुम्हीही कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर यासाठी आम्ही अशा म्युच्युअल फंडांबद्दल सांगणार आहोत जो 5 वर्षात 37% पेक्षा जास्त रिटर्न देत आहे. या फंडाचे नाव आहे SBI बचत निधी – डायरेक्ट प्लॅन ग्रोथ.

 

2004 मध्ये एसबीआयने केला लाँच
स्टेट बँक सेव्हिंग फंड हा डेट मनी मार्केट फंड आहे. तो बँकेने 2004 मध्ये सुरू केला होता.
या फंडच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता 24756.98 कोटी आहे. 30 मार्च 2022 रोजी त्याची NAV 35.5508 रुपये होती.
या फंडाने गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न दिला आहे. (SBI Savings Fund)

 

किती मिळाले आहे रेटिंग ?
रेटिंग एजन्सी क्रिसिल आणि व्हॅल्यू रिसर्चने एसबीआय बचत निधीला 3 आणि 4 रेट दिला आहे.
या योजनेत करता येणारी किमान गुंतवणूक 500 रुपये आहे. यामध्ये लॉक इन पीरियड नाही.
ज्या लोकांना कमी कालावधीत चांगला रिटर्न हवा आहे, जे जोखीम घेऊ शकतात ते या फंडात गुंतवणूक करू शकतात.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

गुंतवणुकीवर मिळेल इतका रिटर्न
एसबीआय बचत निधीने एका वर्षात 3.99 टक्के रिटर्न दिला आहे. दोन वर्षांत 9.88% रिटर्न दिला आहे तर वार्षिक आधारावर 4.82%. तीन वर्षांत 18.35 टक्के आणि पाच वर्षांत 37.05 टक्के रिटर्न दिला आहे.
दुसरीकडे, एसबीआय एका वर्षात 2.16 टक्के, 2 वर्षात 4.37, 3 वर्षात 7.61 आणि 5 वर्षात 15.85 टक्के रिटर्न देते.

 

Web Title :- SBI Savings Fund | sbi savings fund invest in state bank savings fund get more than 37 percent return in 5 years

 

हे देखील वाचा :

Coffee Benefits | कॉफी पिण्याने कमी होतो ‘या’ आजारांचा धोका! जाणून घ्या किती कप पिणे आहे लाभदायक

Dilip Walse Patil On Raj Thackeray | मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याच्या राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Pune Crime | पतीचा खून करुन आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पत्नी व मुलाला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

 

Related Posts