IMPIMP

Shambhuraj Desai | ‘धोतऱ्याच्या कडू बिया’ म्हणणाऱ्या संजय राऊतांना शंभूराज देसाई यांचा टोला, म्हणाले-‘102 दिवस कारागृहात असल्यामुळे त्यांना…’

by nagesh
Shambhuraj Desai On Sanjay Raut | sanjay raut should keep his mouth shut otherwise shinde group leader shambhuraje desai targets raut maharashtra politics news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणात (Goregaon Patrachal Scam) शिवसेनचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP
Sanjay Raut) यांचा बुधवारी पीएमएलए कोर्टाने (PMLA Court) जामीन मंजूर (Bail Granted) केला. 102 दिवसानंतर संजय राऊत तुरुंगातून बाहेर
आले. तुरुंगाबाहेर आल्यानंतर राऊत आपल्या स्टाईलमध्ये परतले अन् पहिला वार एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर केला. एकच
शिवसेना खरी, बाकी धोत्र्याच्या कडू बिया अशा शब्दात राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधला. संजय राऊतांच्या टीकेला शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कदाचित 102 दिवस ते कारागृहात होते, त्यामुळे त्यांना बाहेर घडणाऱ्या गोष्टींची कल्पना नसेन. मात्र, आमच्या पक्षाचे नावच ‘बाळासाहेबांची शिवसेना’ (Balasaheb’s Shiv Sena) आहे, असे शंभूराज देसाई (Shambhuraj Desai ) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले, आमच्या पक्षाचे नाव ‘बाळासाहेबांची शिवसेना’’ असे आहे. कदाचित 102 दिवस ते कारागृहात होते. त्यामुळे त्यांना या गोष्टीची कल्पना नसेन. आम्ही शिवसेना सोडलेली नाही किंवा पक्षही फोडला नाही. बहुमतातली शिवसेना ही ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आहे. त्यामुळे संजय राऊत अशी वक्तव्य करुन लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. ही त्यांची नेहमीची सवय आहे, असे प्रत्युत्तर शंभूराज देसाई यांनी राऊतांना दिले.

 

आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. आम्ही बाळासाहेबांची भूमिका घेऊनच पुढे जात आहोत.
मात्र, ही वेळ उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेवर का आली हे तीन महिन्यात उद्धव ठाकरे यांना समजले असेल.
केवळ संजय राऊत यांच्यामुळे 40 आमदार आणि 12 खासदारांनी अशी भूमिका घेतली.
त्यामुळे आता संजय राऊतांचे किती ऐकायचे हे आता उद्धव ठाकरेंनी ठरवण्याची गरज आहे, असेही शंभूराज देसाई म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :- Shambhuraj Desai | shambhuraj desai replied to sanjay raut criticism on shivsena party name

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कोरोनामध्ये पती गमाविलेल्या महिलेचा दीराने केला विनयभंग; डेक्कन पोलीस ठाण्यात FIR

Anjali Damania | अंजली दमानिया यांची राऊतांवर टीका, म्हणाल्या – ‘ईडीने त्यांच्या मर्जीतील आरोपिंना अटक केली यात शंका नाही, पण संजय राऊत…’

Sanjay Raut | संजय राऊत मातोश्रीवर नंतर जाणार सर्वप्रथम शरद पवारांच्या भेटीला

 

Related Posts