IMPIMP

Anjali Damania | अंजली दमानिया यांची राऊतांवर टीका, म्हणाल्या – ‘ईडीने त्यांच्या मर्जीतील आरोपिंना अटक केली यात शंका नाही, पण संजय राऊत…’

by nagesh
Anjali Damania | social activist anjali damania slams sanjay raut after bail granted pmla

मुंबई: सरकारसत्ता ऑनलाईन  शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची विशेष पीएमएलए (PMLA) न्यायालयाने गोरेगाव पत्राचाळ भूखंड प्रकरणातून जामीनावर सुटका केली आहे. त्यावर विविध मान्यवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. पत्राचाळ घोटाळा आणि त्यासंदर्भात भूमिका मांडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी देखील याप्रकरणावर भाष्य केले आहे. अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी राऊत आरोपी नाहीत, हे शक्य नाही, असे म्हंटले आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

“सक्तवसुली संचलनालय (ED) काही ठरावीक लोकांना अटक करत आहे, ह्यात काहीच शंका नाही. ईडी मुख्य आरोपींना अटक न करता, केवळ ईडीच्या मर्जीतील आरोपींना अटक करत आहे, ह्यातही काही शंका नाही. सक्तवसुली संचलनालयाचा सर्रास गैरवापर होतो आहे. पण, संजय राऊत आरोपी नाहीत, त्यांनी गैरव्यवहार केला नाही, हे शक्य नाही.” असे ट्वीट दमानिया यांनी केले आहे.

 

 

विशेष न्यायालयाने बुधवारी संजय राऊत आणि त्यांचे बंधू प्रवीण राऊत यांची दोन लाखांच्या जातमुचल्यावर सुटका केली. तसेच यावेळी न्यायलयाने ईडीला देखील स्पष्ट शब्दात सुनावले. ईडीने आपल्या मर्जीतील आरोपींना अटक केली आहे. त्यांनी या प्रकरणातील प्रमुख सूत्रधारांना अटक केली नाही. संजय राऊत यांचा या प्रकरणात प्रभावी सहभाग नसताना देखील त्यांना अटक केली होती. त्यांची अटक ही बेकायदा होती. ईडीने आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आहे. तसेच ईडी ज्याप्रकारे आणि ज्या वेगाने अटक करते, त्याच विलक्षण वेगाने आरोपपत्र दाखल करणे आणि पुढील कारवाई करत नाही, असे देखील न्यायालयाने निरीक्षणात नोंदविले. त्यामुळे संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला. ईडीने देखील विशेष न्यायालयाच्या या निकालावर स्थगिती मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. पण न्यायालयाने ही याचिका प्रलंबित ठेवली आहे.
त्यामुळे राऊत आणि त्यांच्या बंधुंच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राऊत यांनी देखील बाहेर येताच न्यायपालिका आणि शिवसैनिकांचे आभार मानले आहेत.
तसेच त्यांनी मला अटक करुन केंद्राने किती मोठी चूक केली आहे, हे आता त्यांना कळेल, असे म्हंटले आहे.

 

 

Web Title :-  Anjali Damania | social activist anjali damania slams sanjay raut after bail granted pmla

 

हे देखील वाचा :

Pune Crime | 5 लाख रुपयांच्या व्याजाचा हप्ता देणे चुकल्यास दररोज 15000 दंड घेणार्‍या रास्ता पेठेतील सावकारावर कारवाई

Sanjay Raut | संजय राऊत मातोश्रीवर नंतर जाणार सर्वप्रथम शरद पवारांच्या भेटीला

Gold Rate Today | तुळशी विवाहानंतर सोन्या-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

 

Related Posts