IMPIMP

Shambhuraj Desai | खाते वाटपावर शिंदे गटातील 9 मंत्री नाराज ? शंभूराज देसाई म्हणतात..

by nagesh
Shambhuraj Desai | shambhuraj desai reply ncp over dada bhuse remark sharad pawar assembly sanjay raut reaction

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिंदे-फडणवीस सरकारचा (Shinde-Fadnavis Government) मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) झाल्यानंतर खातेवाटप (Allocation of Portfolios) करण्यात आले. परंतु खातेवाटपानंतर शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shiv Sena) करणाऱ्या शिंदे गटातील दादा भुसे (Dada Bhuse), संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्यासह काही मंत्री नाराज असल्याच्या जोरादर चर्चा आहेत. यावरुन विरोधकांनी देखील टीका केली. आता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

खाते वाटपावर आमच्या नऊ मंत्र्यांपैकी कोणीही नाराजी व्यक्त केली नाही. नाराज असल्याचा वावड्या जाणीवपूर्व उठवल्या जात आहेत, असं राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री (State Excise Minister) शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी म्हटलं. तसंच चांगल्या वातावरणात अधिवेशन (Maharashtra Assembly Session) पार पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये (Uddhav Thackeray Government) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन खात्याचा कारभार होता. आता त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्काचे कॅबिनेट मंत्रिपद आहे.

 

आम्ही पहिल्या टप्प्यात शपथ घेतलेले शिवसेनेचे (Shivsena) नऊ मंत्री आहोत. या मंत्र्यांकडे कोणते विभाग द्यायचे हा पूर्णपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांचा अधिकार असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले.

 

आम्ही शिवसेनेचे 40 आमदार आणि 11 अपक्ष आमदार (Independent MLA) सर्वांनी पहिल्याच दिवशी आम्हाला मंत्रिमंडळात घ्यायचं का नाही, घेतल्यावर कोणतं खातं द्यायचं या सर्व बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. त्यामुळे आमचे कुणीही मंत्री असं बोलत नाहीत. ते स्व:: बोलत नसताना कुणीतरी अशा वावड्या उठवत आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जी खाती दिलीत त्याचं काम त्यांना अभिप्रेत आहे असं करणं यावरच आमचा भर आहे. आम्ही कुणीही नाराज नाही, असं देसाई म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

उद्या अधिवेशन सुरु होणार आहे. चांगल्या वातावरणात अधिवेशन पार पडेल.
आज संध्याकाळी पाच वाजता सर्व विरोधी पक्षनेत्यांना चहापानासाठी बोलावलं आहे.
आज मंत्रिमंडळ बैठक होईल. यामध्ये पुरवणी मागण्यांबाबत देखील चर्चा होईल. 17 ते 25 पर्यंत अधिवेशन पार पडेल.
राज्य मंत्रिमंडळ आगामी अधिवेशनाला अभ्यासपूर्ण सामोरं जाईल, असं शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं.

 

Web Title : –  Shambhuraj Desai | shambhuraje desai comment on speculations of unrest in shinde group over portfolio

 

हे देखील वाचा :

Vitamins For Women | महिलांसाठी अतिशय आवश्यक आहे ‘हे’ व्हिटॅमिन्स, जवळपासही येणार नाहीत अनेक आजार

IAS Shekhar Singh | पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची बदली; शेखर सिंह नवे आयुक्त

Food For Liver | ‘हे’ खाल्ल्याने होणार नाही लिव्हर डॅमेज, होतील अनेक फायदे

 

Related Posts