IMPIMP

Shivsena Chief Uddhav Thackeray | शिवसैनिकांवर हल्ला, उद्धव ठाकरे भडकले; पोलिसांना झापलं, एकनाथ शिंदेंवरही निशाणा

by nagesh
Maha Vikas Aghadi | maharashtra karnataka border dispute mahavikas aghadi uddhav thackeray ajit pawar nana patole

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनभायखळा येथील दोन शिवसैनिकांवर (Byculla Shivsainik) गुरुवारी रात्री हल्ला (Attack) झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांची तक्रारही घेतली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी दुपारी भायखळामध्ये जाऊन त्या शिवसैनिकांची विचारपूस केली. तसेच जीवाशी येत असेल तर खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी भायखळा येथील रामभाऊ भोगले मार्गावरील 208 नंबरच्या शाखेला भेट दिली. यावेळी त्यांनी शिवसैनिकांची विचारपूस केली. भायखळा येथील शिवसेना पदाधिकारी बबन गावकर (Baban Gawkar) आणि विजय कामतेकर (Vijay Kamtekar) यांच्या गाडीवर काही जणांनी हल्ला केला होता.

 

शिवसैनिकांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी (Shivsena Chief Uddhav Thackeray) आज शिवसेना शाखेत जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधला, त्यांना आधार दिला. शिवसैनिकांच्या केसाला जरी धक्का लागला तरी खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी संबंधितांना दिला. तसेच पोलिसांवर (Byculla Police) हलगर्जीपणाचा आरोप करत त्यांनाही झापलं.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

संरक्षण का नाही दिलं ? असा जाब उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना विचारला.
यावेळी पोलिसांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसैनिकांचं रक्त न सांडण्याचं मी आव्हान करतोय.
मात्र असं होत असेल तर खपवून घेतलं जाणार नाही. जीवाशी येत असेल तर खपवून घेतलं जाणार नाही. कारवाई झाली पाहिजे.
तुम्ही तात्काळ कारवाई करा. आरोपींना तुम्ही चौकशीसाठी का बोलवलं नाही ? अस  कधी झालं नव्हतं.
तुम्ही राजकारणात पडू नका, असेही त्यांनी पोलिसांना सांगितलं.
दरम्यान भायखळा पोलिसांनी आमची तक्रार घेतली नाही, असं शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं.

 

Web Title :- Shivsena Chief Uddhav Thackeray | shiv sena chief uddhav thackeray meets byculla shivsainik

 

हे देखील वाचा :

Soil Health Card | गावात राहून सरकारी मदतीने करा ‘हा’ बिझनेस, होईल शेतकर्‍यांची गर्दी, लाखोत होईल कमाई

Uric Acid | ‘ही’ 5 कामे केली तर यूरिक अ‍ॅसिड राहील कंट्रोल, जाणून घ्या काय खावे आणि काय टाळावे

Pune Pimpri Crime | उच्चशिक्षित तरुणाची आठव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर

 

Related Posts