IMPIMP

Shivsena MP Shrirang Barne | ‘राजेश टोपेंची तक्रार उद्धव ठाकरेंकडे करणार’; शिवसेना खासदाराचं वक्तव्य

by nagesh
Shivsena MP Shrirang Barne | Maval Shivsena MP and leader shrirang barne slams ncp and jalna palak mantri rajesh tope

जालना :  सरकारसत्ता ऑनलाइन – Shivsena MP Shrirang Barne | महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) तीन पक्ष एकत्र आहेत. मात्र अनेकवेळा कुरबुरी कानावर येत असल्याचं पाहायला मिळतं. अशातच आता मावळचे शिवसेनेचे (Maval Shivsena Leader) खासदार श्रीरंग बारणे (Shivsena MP Shrirang Barne) यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्यावर निशाणा साधला आहे. जालन्यामध्ये (Jalna) ते पत्रकारांशी ते बोलत होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

राष्ट्रवादीच्या (NCP) पालकमंत्र्यांकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची कामं होत नाहीत. यासंदर्भात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून सूचना मिळाल्या आहेत. याचा अहवाल पक्षप्रमुखांना पाठवणार असल्याचं म्हणत श्रीरंग बारणे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंवर टीका केली. राजेश टोपे हे जालन्याचे पालकमंत्री आहेत. यावेळी बोलताना बारणे यांनी अनेक मुद्द्यांवर आपलं मत मांडलं.

 

आपण आपल्या मुलीला महाराष्ट्रात (Maharashtra) ठेवणार नसल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी म्हटलं होतं. यावर बोलताना, महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्य असून देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सुरक्षित आहे. त्यामुळे मुलीला महाराष्ट्रात ठेवायचं की नाही हा प्रश्न त्यांनाच विचारा, माणूस बोलण्याच्या ओघात बोलून जातो त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचं बारणे म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये (Local Body Elections) युतीबाबतही (Alliance) बारणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पक्ष वाढवण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे, त्यामुळे आगामी स्थानिक निवडणुकांंमध्ये युती करायची की नाही?,
याचा निर्णय जिल्हा-जिल्ह्यातील स्थानिक नेते घेतील, असं श्रीरंग बारणे म्हणाले.

 

Web Title :- Shivsena MP Shrirang Barne | Maval Shivsena MP and leader shrirang barne slams ncp and jalna palak mantri rajesh tope

 

हे देखील वाचा :

Weather Update | कोकणात ढगाळ वातावरण तर विदर्भात उकाडा; ‘या’ जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार

Sanjay Raut | ‘एक पुतीन दिल्लीत बसलेत जे…’; संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींची पुतीन यांच्याशी तुलना करत केली जहरी टीका !

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांची काँग्रेसला थेट ऑफर; म्हणाले – ’24 तासांत निर्णय घ्या..’

 

Related Posts