पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune | हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब गणपती ट्रस्टच्या बाप्पांचे आज (रविवार) तालसम्राट पद्मश्री शिवमणीजी, ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, भाजपच्या चित्रा वाघ, आमदार रविंद्र धंगेकर, काँग्रेसचे नेते मोहन जोशी, राज्य शासनाच्या गृह विभागाचे सह सचिव कैलास गायकवाड, पुणे ग्रामीणचे अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, अभिनेत्री कायनात अरोरा, अभिनेता शिव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी दर्शन केले. ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीतदादा बालन (Punit Balan) यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune)
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
रविवारी सकाळी सीमेवर लढताना अपंगत्व आलेल्या भारत मातेच्या सुपुत्रांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. त्यानंतर अध्यक्ष संजीव जावळे यांनी भारत मातेच्या सुपुत्रांना गौरविले. दुपारी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्रस्टला भेट देवून श्रींची आरती केली. काही वेळानंतर राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे बाप्पांच्या दर्शनासाठी आले. त्यांनी आरती केली. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तालसम्राट पद्मश्री शिवमणी यांच्याहस्ते वाद्यपूजन करण्यात आले. वंदेमातरम् संघटना कृत युवा वाद्य पथक, रूद्रांग वाद्य पथक, कलावंत वाद्य पथक, अभेद्य वाद्य पथक, शिवसाम्राज्य वाद्य पथक आणि शिववर्धन वाद्य पथक यांनी यावेळी एकत्रित वाद्यपूजन केले. (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune)
दरम्यान, काँग्रेसचे कसबा मतदार संघाचे आमदार रविंद्र धंगेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी हे बाप्पांच्या दर्शनासाठी दाखल झाले. त्यांनी श्रींचे दर्शन घेतले. पुनीतदादा बालन यांनी त्यांचा सन्मान केला.
रात्री आठ वाजता महाआरतीस सुरूवात झाली. ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे, राज्य गृह विभागाचे सह सचिव कैलास गायकवाड,
पुणे ग्रामीणचे अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. यावेळी अभिनेत्री कायनात अरोरा आणि
अभिनेता शिव ठाकरे यांनी देखील बाप्पांचे दर्शन घेतले.
रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सकाळीपासुन श्रींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी झुंबड उडाली होती.
सायंकाळी तर प्रचंड गर्दी झाली होती. महाआरतीला तर भाविकाचा पूरच आला होता.
रात्री उशिरापर्यंत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी मोठी रांग लागली होती.
रात्रीच्या वेळेस देखील अनेक मान्यवरांनी बाप्पांचे दर्शन घेतले.