IMPIMP

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | भाऊसाहेब रंगारी आणि लोकमान्य टिळकांमुळे पुण्याचा गणेशोत्सव जगभर लोकप्रिय – आमदार रवींद्र धंगेकर

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा वासा पुजन सोहळा

by sachinsitapure
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | Pune's Ganeshotsav is popular all over the world because of Bhausaheb Rangari and Lokmanya Tilak - MLA Ravindra Dhangekar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रींमंत भाऊसाहेब रंगारी (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati) यांनी सुरू केला. लोकमान्य टिळकांनी (Lokmanya Tilak) या गणेशोत्सवाचा (Pune Ganeshotsav 2023) प्रसार केला आणि पुढे पुण्याचा गणेशोत्सव संपुर्ण जगभर लोकप्रिय झाला असे प्रतिपादन आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी केले.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या गणेशोत्सवाचा वासा पुजन सोहळा सोमवारी पार पडला. या समारंभाला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन, आमदार रविंद्र धंगेकर, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त प्रविण कुमार पाटील (IPS Pravinkumar Patil), पोलिस उपायुक्त संदिपसिंग गिल (IPS Sandeep Singh Gill), गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविण परदेशी (Pravin Pardeshi) आदी उपस्थित होते. वासा पुजन सोहळ्याने मंडप उभारण्याच्या कामाला सुरवात होते.

 

या सर्व मान्यवरांनी मंडपाचे वासा पुजन आणि श्रीफळ वाढवून उत्सवाचा प्रारंभ केला. यावेळी आमदार धंगेकर म्हणाले,
पोलिस प्रशासन आणि गणेशभक्त एकत्र येऊन यावर्षींचा सोहळा आणखी दिमाखदार होईल यासाठी काम करू.
तर सह पोलिस आयुक्त कर्णिक म्हणाले, गणेशोत्सवाला सर्वांचे सहकार्य लाभते. पोलिस विभागाकडूनही सर्व तयारीला सुरवात झाली आहे. यावर्षींचा उत्सव आणखी जोमाने साजरा होईल. गणेश भक्तांच्या सुरक्षितेसाठी पोलिस प्रशासन 24 तास काम करेल. उत्सव भक्ती भावाने आणि आनंदाने साजरा व्हावा हीच आमची भुमिका असल्याचे त्यांनी सांगितले. (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati)

उत्सवप्रमुख पुनित बालन (Punit Balan) यांनी दरवर्षीप्रमाणे धार्मिक पारंपारिक पध्दतीने गणेशोत्सव साजरा होईल
असे सांगत दहा दिवसातील उपक्रमांची माहिती दिली.

Related Posts