IMPIMP

Skin Care Tips | चेहर्‍यावरील मुरुमांनी त्रस्त आहात का? मग ‘या’ 4 प्रकारे करा लाल चंदनाचा वापर

by nagesh
Skin Care Tips | skin care tips use red sandalwood to remove acne from the face

सरकारसत्ता ऑनलाइन – Skin Care Tips | लाल चंदन (Red Sandalwood) वापरल्याने त्वचेला थंडावा मिळतो. लाल चंदनाच्या लाकडाचा वापर औषधे बनवण्यासाठीही केला जातो. लाल चंदनामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्वचेतील डाग, मुरुम इत्यादी समस्या दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो. दुसरीकडे, जर तुम्ही मुरुम दूर करण्यासाठी चांगला उपचार शोधत असाल तर तुम्ही लाल चंदन वापरू शकता. लाल चंदन वापरण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात. (Skin Care Tips)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अशा प्रकारे वापरा लाल चंदन-

1. लाल चंदन पेस्ट (Red Sandalwood Pest)
पाण्यात लाल चंदन बारीक करून पेस्ट तयार करा. नंतर ही पेस्ट स्वच्छ चेहर्‍यावर मुरुम-असलेल्या भागावर लावा आणि तशीच राहू द्या. 15 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. लाल चंदनाची पेस्ट लावल्याने त्वचेवरील सूजही दूर होते. मुरुमांच्या ठिकाणी सूज किंवा वेदना जाणवत असल्यास लाल चंदनाचा वापर फायदेशीर ठरेल. (Skin Care Tips)

 

2. लाल चंदन आणि हळदीचा वापर (Red Sandalwood and Turmeric)
मुरुमांची समस्या दूर करण्यासाठी लाल चंदनाच्या पावडरमध्ये हळद मिसळून मुरुमांवर लावा. असे केल्याने तुम्हाला आराम मिळेल आणि मुरुम बरे होतील. दुसरीकडे, लाल चंदनाच्या पावडरमध्ये लिंबाचा रस आणि कापूर मिसळल्याने मुरुमांच्या भागात खाज येण्याच्या समस्येपासून देखील आराम मिळेल.

 

3. लाल चंदन पावडर आणि खोबरेल तेल (Red sandalwood powder and coconut oil)
तुम्ही लाल चंदन पावडर खोबरेल तेलात मिसळून मुरुमांवर लावू शकता. यामुळे मुरुमे बरी होतील. मुरुमांच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही 2 ते 4 ग्रॅम चंदन पावडर घेऊ शकता.

 

4. कडुलिंबाची पेस्ट आणि लाल चंदन (Neem paste and red sandalwood)
लाल चंदन बारीक करून पावडर बनवा. त्या पावडरमध्ये कडुलिंबाच्या पानांची पेस्ट आणि गुलाबपाणी (rose water) मिसळून चेहर्‍याला लावा. यामुळे मुरुमांची समस्या दूर होईल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Skin Care Tips | skin care tips use red sandalwood to remove acne from the face

 

हे देखील वाचा :

Bhagat Singh Koshyari | महाराष्ट्रात सर्वत्र संतापाची लाट उसळल्यानंतर अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं स्पष्टीकरण, म्हणाले..

CM Eknath Shinde Group | 65:35 चा फॉर्म्युला, पण महत्त्वाच्या खात्यांवरून शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळाचा तिढा ?

Cholesterol Symptoms | कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढल्यानंतर शरीर देते असे संकेत, दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

 

Related Posts