IMPIMP

Sourav Ganguly | सौरभ गांगुलीच्या BCCI अध्यक्षपदाचा वाद न्यायालयात, कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल

by nagesh
Sourav Ganguly | pil filed in calcutta hc over removal of sourav ganguly from bcci president post

सरकारसत्ता ऑनलाईन  –  भारताचा (India) माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी बीसीसीआयच्या (BCCI) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भारताचे माजी खेळाडू रॉजर बिन्नी (Roger Binney) यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली. मात्र आता सौरव गांगुली यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आल्यामुळे कोलकाता उच्च न्यायालयात (Calcutta High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील रामप्रसाद सरकार (Advocate Ramprasad Sarkar) यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सौरव गांगुली हे आणखी तीन वर्ष बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर राहू शकतात, असं सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) स्पष्ट आदेश दिला होता. मात्र, तरीही सौरव गांगुलींना बीसीसीआयच्या प्रमुखपदावरून हटवण्यात आले असा युक्तिवाद यावेळी सरकारी वकिलांकडून करण्यात आला. “सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जय शाह (Jai Shah) यांना 2025 पर्यंत आणखी तीन वर्षे बीसीसीआय सचिवपदी राहता येणार आहे. जय शाह बीसीसीआयच्या सचिवपदी कायम असूनही गांगुली यांना मात्र हटवण्यात आले आहे.

 

 

सौरव गांगुलींना अध्यक्षपदावरून हटवण्यामागं षडयंत्र
“भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बंगाल संघाचा माजी खेळाडू असल्याने गांगुली हा बंगालचा अभिमान आहे. हा राज्याचा अपमान आहे. त्यांना हटवण्यामागं नक्कीच काहीतरी राजकीय षडयंत्र आहे”, असा दावा सरकारी वकिलांकडून करण्यात आला आहे.

 

 

सौरव गांगुलींची प्रतिक्रिया
बीसीसीआयच्या अध्यक्ष पदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटले कि, प्रशासक म्हणून त्यांनी दीर्घ खेळी खेळली असून आता त्यांचं लक्ष मोठं काही करण्यावर आहे. “मी बराच काळ प्रशासक राहिलो आहे. पण आता मी माझ्या आयुष्यात पुढे जातोय.
मी टीम इंडियासाठी 15 वर्षे खेळलो, हे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ असेल. मी बीसीसीआयचा अध्यक्षही होतो.
आता माझं लक्ष काहीतरी मोठं करण्यावर आहे.” असे ते म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सीएबी अध्यपदाच्या निवडणुकीतून देखील माघार
बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर गांगुलीने क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे
(Cricket Association of Bengal) अध्यक्ष होण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती.
मात्र, अखेरच्या क्षणी माघार घेऊन त्यांनी आपला मोठा भाऊ स्नेहसिस गांगुली (Snehsis Ganguly) यांना
पाठिंबा दिला. स्नेहसिस गांगुलीदेखील बंगाल संघाचे माजी खेळाडू आहेत.

 

 

Web Title :-  Sourav Ganguly | pil filed in calcutta hc over removal of sourav ganguly from bcci president post

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | ‘रणछोडदास’ मैदान सोडून पळून गेले’, शिंदे गटाची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका

Maharashtra Politics | ‘भविष्यात वेगळं काहीतरी… ‘, एकनाथ शिंदे-शरद पवार भेटीवर राष्ट्रवादीच्या आमदाराचं सूचक विधान; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

MS Dhoni | IPS अधिकाऱ्याच्या विरोधात महेंद्रसिंग धोनीची याचिका, काय आहे संपूर्ण प्रकरण

 

Related Posts