IMPIMP

ST Corporation Recruitment | एसटी महामंडळात 5 हजार कंत्राटी चालकांची लवकरच भरती; व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची माहिती

by nagesh
Maharashtra Karnataka Border Issue | 660 rounds of ST running Kolhapur Karnataka cancelled

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन ST Corporation Recruitment | मागील पाच ते सहा महिन्यामध्ये राज्यभर एसटी कामगारांनी संप (ST Workers Strike) पुकारला होता. त्या काळात प्रवाशांची अधिकच तारांबळ उडाली. पाच महिन्यानंतर मुंबई हाय कोर्टाच्या (Mumbai High Court) निर्देशानंतर अखेर संप मिटला. आंदोलनादरम्यान अनेक घडामोडी घडल्या. एसटी कामगारांच्या या संपातून बोध घेत एसटी महामंडळाकडून (MSRTC) सुमारे पाच हजार कंत्राटी चालकांची भरती (ST Corporation Recruitment) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत आगामी दोन ते तीन दिवसामध्ये याबाबत अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (MSRTC Recruitment)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने (Shekhar Channe) म्हणाले, “महामंडळाने एसटी कामगारांच्या बेमुदत संपानंतर कंत्राटी चालकांची भरती केली होती. मात्र, संप मिटताच या कंत्राटी चालकांना कामावरुन कमी करण्यात आलं होतं. तर, काहींना मुतदवाढही देण्यात आली होती. त्यात, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, लातूर, बीड, जालना, उस्मानाबाद या विभागांतील कंत्राटी चालकांचा समावेश आहे. त्यामुळे, आता, ५ हजार कंत्राटी चालकांची खासगी कंपनीमार्फत भरती करण्यात येईल़ ही भरती टप्प्याटप्प्याने होईल, याबाबतची जाहिरात 2-3 दिवसांत काढण्यात येणार असल्याचे,” ते म्हणाले. (ST Corporation Recruitment)

 

पुढे ते म्हणाले, “राज्यातील कोकण, पुणे विभागासह इतर काही विभागांत एसटीच्या चालकांची कमतरता भासत आहे. त्यातूनच, अनेकदा बसगाड्या स्थानकातच पडून राहतात. त्यामुळे, महामंडळाकडून नव्याने पाच हजार कंत्राटी चालकांची भरती केली जाणार आहे. सध्या परीक्षा देऊन ”प्रतीक्षा यादीवर असलेले कर्मचारी हे कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून एसटीत येऊ शकतात. एसटीतील निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्यास, लवकरच प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना संधी मिळेल, याबाबतचा निर्णय लवकरच होईल.”

 

Web Title :- ST Corporation Recruitment | MSRTC st-corporation-recruits-5000-contract-drivers-soon

 

हे देखील वाचा :

New Wage Code | कर्मचार्‍यांमध्ये नाराजी ! पुढील महिन्यापासून कमी होणार ’इन हँड सॅलरी’ परंतु वाढणार रिटायर्मेंटचे फायदे

Agnipath Scheme Salary | ’अग्निवीर’ला 30% कापून मिळेल पगार, 4 वर्षानंतर हेच पैसे मिळतील एकरकमी

Pune Crime | चोरीची दुचाकी विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

 

Related Posts