IMPIMP

Pune News | खुशखबर ! मुंबईच्या धर्तीवर पुणे, पिंपरीतील झोपडपट्टीधारकांना मिळणार 300 चौरस फुटांची घरे

by nagesh
Pune News | Good news! On the lines of Mumbai, hut owners in Pune and Pimpri Chinchwad will get 300 square feet houses

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune News | झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी (slum rehabilitation authority) राज्य सरकारने प्रारूप सुधारित नियमावलीला मंजुरी दिली आहे. यामध्ये ‘एफएसआय’ (FSI) वापरण्याची मर्यादा कमाल तीन वरून किमान चारपर्यंत देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईच्या (Mumbai) धर्तीवर पुणे (Pune News) आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरातील झोपडीधारकांना २६९ चौरस फूट (२५ चौरस मीटर) ऐवजी ३०० चौरस फुटांची (२७.८८ चौरस मीटर कार्पेट) सदनिका मोफत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

राज्य सरकारकडून २००५ मध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी एसआरएची (SRA) स्थापना करण्यात आली. २००८ मध्ये झोपडपट्टीचे पुनर्वसन प्रकल्पासाठी या प्राधिकरणामार्फत नियमावली तयार केली. त्यामध्ये २५ चौरस मीटर क्षेत्रफळाची सदनिका झोपडपट्टीधारकांना मोफत देण्याची, तसेच त्यासाठी जास्तीत जास्त तीन एफएसआय वापरून बांधकामास परवानगी देण्याची तरतूद केली होती. मात्र २०१५ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने त्यामध्ये सुधारणा करत ‘एफएसआय’मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा फटका शहरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन प्रकल्पांना बसला किंबहुना त्यांचे काम थांबले. त्यानंतर भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले. प्राधिकरणाच्या नियमावलीत बदल होईल असे वाटत होते. पण अशा प्रकल्पांसाठी नवीन फर्म्युला वापरून बांधकामास परवानगी देण्याचे आदेश सरकारने (Maharashtra Government) काढले त्यामुळे अनेक ठिकाणच्या योजना अडचणीत आल्या.

प्राधिकरणाने यातून मार्ग काढण्यासाठी नव्याने सुधारित नियमावली तयार केली. त्यामध्ये झोपडपट्टीधारकांना देण्यात येणाऱ्या सदनिकांच्या क्षेत्रफळात वाढ सुचविली. त्यासाठी तीन पर्यंत एफएसआय वापरण्याची मर्यादा काढून ती कमीत कमी चार व जास्तीत जास्त देण्याची शिफारस केली. हि सुधारित नियमावली मंजुरीसाठी राज्यसरकारकडे पाठवण्यात आली. त्याला तीन दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील झोपडपट्टीधारकांना २६९ ऐवजी ३०० चौरस फुटांचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सहकारनगर (Sahakarnagar) मधील झोपडपट्टीधारक फरीद शेख म्हणाले की, २६९ चौरस फुटांची सदनिका वाढत्या कुटूंबसंख्येमुळे अपुरी पडत होती. आता ३०० चौरस फुटांची सदनिका मिळणार असल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळला आहे. तर एरंडवणे (erandwane pune) येथील एक झोपडपट्टीधारक म्हणाले, राज्य सरकारने झोपडपट्टीधारकांना मिळणाऱ्या सदनिकांच्या क्षेत्रफळात वाढ करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. यामुळे झोपडपट्टीधारकांना दिलासा मिळणार आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

 

१५ वर्षात अवघ्या ४ टक्के जणांचे पुनर्वसन

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे दहा लाखाहून अधिक झोपडपट्टीधारकांची संख्या आहे.
त्यानुसार पुण्यात ४८६, तर पिंपरी-चिंचवड शहरात ७१ झोपडपट्ट्या आहेत.
मात्र एवढी मोठी संख्या असुनही १५ वर्षात केवळ ८ हजार ३४३ झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन झाले आहे.
म्हणजे एकूण झोपडपट्टीधारकांच्या संख्येच्या तुलनेत अवघ्या ४ टक्के झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन आतापर्यंत झाले आहे.
त्यामुळे आता सुधारित नियमावलीमुळे पुनर्वसनाच्या कामाला गती येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

 

Web Title : Pune News | Good news! On the lines of Mumbai, hut owners in Pune and Pimpri Chinchwad will get 300 square feet houses

 

हे देखील वाचा :

Solapur Crime | धक्कादायक ! पतीच्या निधनानंतर पत्नीचीही रेल्वेखाली आत्महत्या; प्रचंड खळबळ

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत आणखी घसरण; जाणून घ्या आजचे दर

Solapur Crime | पुण्यातील ‘विवाहित’ प्रेमी युगुलाची सोलापूर जिल्ह्यातील लॉजवर आत्महत्या; जाणून घ्या प्रकरण

BJP-MNS Alliance | ‘या’ 4 निवडणुकांमध्ये भाजप-मनसे युती होणार? शिवसेनेची चिंता वाढली?

 

Related Posts