IMPIMP

Sushilkumar Shinde | माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार यांच्या ‘त्या’ वक्तव्याने बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबद्दल संभ्रम वाढला

by nagesh
Sushilkumar Shinde | sushilkumar shinde comment over congress leader balasaheb thorat resignation

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Sushilkumar Shinde | काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आल्यापासून राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात त्यांचे भाचे असलेले सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांना डावलण्यात आल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. बाळासाहेब थोरात यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र थेट दिल्ली दरबारी पाठविल्याचे बोलले जात आहे. त्यावर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब थोरात यांनी साधे पत्र दिल्लीला पाठविले की राजीनाम्याचे, हे अद्याप माहित नाही. असे यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तसेच, याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना देखील माहित नसल्याचे यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) म्हणाले. ते म्हणाले, ‘बाळासाहेब थोरातांचा विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा आहे की पत्र आहे, हे अजून माहिती नाहीये. त्यांचे कोणाशी बोलणे झालेले नाही. मी काल प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसोबत पुण्यात होतो. पटोले यांनादेखील याबाबत माहिती नाही. तसेच, हे सर्व वाद तात्पुरते असतात सगळं ठीक होईल. काळजी करण्याचं कारण नाही.’ असा विश्वास देखील यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.

 

दरम्यान, आज माध्यमांशी बोलताना काँग्रेसनेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी देखील बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली. अशोक चव्हाण म्हणाले, ‘थोरातांनी राजीनामा देणे हे दुर्दैवी आहे.
मी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करेन. काँग्रेस पक्षासाठी शक्य ते सर्वकाही करेन.’
तसेच विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी थोरात यांनी राजीनामा
दिल्याचे सांगितले. माझी आणि थोरात यांची फोनवरून चर्चा झाली आहे.
त्यांनी मला राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. असे अजित पवार म्हणाले.

 

तर, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावर बोलताना म्हणाले की, ‘आमचा हा पक्षांतर्गत प्रश्न आहे.
बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा आमच्यापर्यंत आलेला नाही. थोरात आमच्याशी बोलत नाहीयेत.’
अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Sushilkumar Shinde | sushilkumar shinde comment over congress leader balasaheb thorat resignation

 

हे देखील वाचा :

Prajakta Mali | अभिनेत्री प्राजक्ताच्या म्हाळसा लूकने चाहते घायाळ; फोटोवर कौतुकांचा वर्षाव

Pune Pimpri Chinchwad Crime | सुरक्षा रक्षकाकडून अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, सोसायटीमधील लोकांची मुलीसोबत हुज्जत; पिंपरी मधील धक्कादायक प्रकार

 

Related Posts