IMPIMP

T20 World Cup 2022 | वर्ल्ड कपमध्ये भारतीय बॉलर्सची धुलाई करणाऱ्या बॅट्समनला विराट कोहलीने दिले ‘हे’ खास गिफ्ट

by nagesh
T20 World Cup 2022 | t20 world cup 2022 virat kohli gifts a bat to litton das after india vs bangladesh match

एडिलेड: वृत्तसंस्था – T20 World Cup 2022 | बुधवारी एडिलेड ओव्हलच्या (Adelaide Oval) मैदानात टीम इंडिया (India) आणि बांग्लादेशमध्ये (Bangladesh) अटीतटीचा सामना पार पडला. या रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशवर 5 धावांनी विजय मिळवून सेमी फायनलच्या (Semi Finals) दिशेने आगेकूच केली आहे. हा सामना जिंकणे दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचे होते. या मॅचमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला. पण बांग्लादेशच्या एका प्लेयरने सर्वांच मन जिंकलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भारत-बांग्लादेश सामना (T20 World Cup 2022) याच खेळाडूमुळे रोमहर्षक बनला. त्या खेळाडूच नाव आहे लिट्टन दास (Lytton Das). या प्लेयरने सुरुवातीपासून टीम इंडियाच्या गोलंदाजांवर प्रहार केला. 185 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लिट्टन दासने 21 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
त्याच्या या फलंदाजीमुळे सातव्या ओव्हरच्या अखेरीस बांग्लादेशची टीम डकवर्थ लुइसमध्ये (Duckworth Louis) पुढे होती.
या खेळीने त्याने विराट कोहलीचे (Virat Kohli) मन जिंकले. यानंतर विराट कोहलीने लिट्टनच्या खेळाच कौतुक म्हणून विराटने त्याला बॅट गिफ्ट केली.

 

न्यूझीलंडचा (New Zealand) संघ सेमीफायनलमध्ये एंट्री करणारा पहिला संघ ठरला आहे.
दरम्यान, ग्रुप 1 मध्ये सेमीफायनलमध्ये एक संघ पक्का ठरलेला असताना ग्रुप 2मध्ये सेमीफायनलची रंगत
वाढली आहे. एकीकडे पाकिस्तानने (Pakistan) द. आफ्रिकेला (south Africa) हरवल्याने त्यांच्या
सेमीफायनलच्या आशा अद्याप जिवंत आहेत. दुसरीकडे भारतही सेमीफायनलमध्ये जाण्याच्या उंबरठ्यावर आहे.
जर भारताने झिम्बाब्वेला (Zimbabwe) हरवले तर भारत डायरेक्ट सेमीफायनमध्ये पोहोचेल.

 

 

Web Title :-  T20 World Cup 2022 | t20 world cup 2022 virat kohli gifts a bat to litton das after india vs bangladesh match

 

हे देखील वाचा :

Nana Patole | ‘सत्तेत असूनही जे आपला पक्ष सांभाळू शकले नाहीत त्यांनी…’, चंद्रकांत खैरेंच्या दाव्यावर नाना पटोलेंचा पलटवार

Pune Crime | पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयाने गुंडाचा तरुणावर कुऱ्हाडीने वार, येरवाड्यातील घटना

Pune Crime | पालघर येथील महिला पोलिसाबरोबर विवाहबाह्य संबंध; कारागृहात पोलिस असलेल्या पत्नीला बेल्टने मारहाण करणारा पुण्यातील पोलिस कर्मचारी ‘गोत्यात’

 

Related Posts