IMPIMP

T20 World Cup | ऑस्ट्रेलियाला हरवून भारताने मोठा विक्रम केला नावावर, टी-20 वर्ल्डकपच्या आधी भारताने पाकिस्तानला दिला झटका

by nagesh
T20 World Cup | india squad t20 wc team management losing confidence on rishabh pant unlikely to be in indian playing xi for blockbuster clash vs pakistan

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – T20 World Cup | रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाने (Indian Team) 3 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला (Australia) पराभूत करुन सामना आणि मालिका जिंकली. टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप विजेता असलेल्या ऑस्ट्रेलियाला मालिकेत पराभूत करुन मोठा विक्रम केला आहे. मिशन टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) आधी, सध्याच्या विश्वविजेत्या संघाविरुद्ध मालिका जिंकल्याने भारतीय संघाचे मनोबल वाढले आहे. विश्वचषकापूर्वी महत्त्वाच्या असलेल्या या मालिकेत भारतीय संघासाठी अनेक सुखद बातम्या समोर आल्या आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर टी-20 मालिकेमध्ये अप्रतिम खेळ दाखवत मालिका जिंकली. एका वर्षात टी-20 फॉरमॅटमध्ये (T-20 Format) सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम (Record) भारताच्या नावावर आहे. भारतीय संघाने या वर्षात आतापर्यंत 21 सामने जिंकले आहे. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानच्या (Pakistan) नावावर होता. भारतीय संघाने 2022 मध्ये 28 टी-20 सामने खेळले असून त्यापैकी 21 सामने जिंकले आहेत. पाकिस्तान संघाने 2021 मध्ये 20 सामने जिंकून विक्रम केला होता.

 

 

कोहलीला सूर गवसला

 

या मालिकेतून भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याला सूर गवसला आहे. मागील काही सामन्यात निराशाजनक कामगिरी त्याच्याकडून होत होती. त्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्माचे फॉर्ममध्ये येणे संघासाठी खूप महत्त्वाचे होते. विराट कोहलीने तीन सामन्यात 76 धावा केल्या आहेत. यात शेवटच्या सामन्यात त्याने 63 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने 3 सामन्यात 74 धावा केल्या असून नागपूरच्या सामन्यात 46 धावांवर तो नाबाद राहिला होता.

 

 

रवींद्र जडेजाला पर्याय मिळाला

 

आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेत रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) जखमी झाल्याने भारतीय संघाला
मोठा धक्का बसला होता. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो टी-20 विश्वचषकातूनही (T20 World Cup)
बाहेर असल्याने रवींद्र जडेजा याच्या जागेवर अक्षर पटेल (Akshar Patel) याला संघात स्थान देण्यात आले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही अक्षरला संधी मिळाली आणि त्याने आपल्या फिरकीच्या जादूने सर्वांनाच चकित
केले. अक्षरकडे चार षटके टाकण्याची, तसेच काही शॉट्स खेळण्याची क्षमता आहे.
अक्षरने तीन सामन्यात 8 विकेट घेतल्या आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- T20 World Cup | india vs australia match result t20 series win rohit sharma virat kohali pakistan record most win in a year

 

हे देखील वाचा :

Maratha Reservation | ओबीसी आरक्षण बाबत बोलताना तारतम्य बाळगा, मराठा क्रांती मोर्चाचा तानाजी सावंत यांना निर्वाणीचा इशारा

Crack Heels Remedies | घरीच बर्‍या करू शकता भेगा पडलेल्या टाचा, ‘या’ आहेत पद्धती

Shivsena On Abdul Sattar | …उगाच काव काव करू नका, शिवसेनेने शिंदे गटाच्या अब्दुल सत्तारांना दिले जशास-तसे उत्तर

 

Related Posts