IMPIMP

Tata Group Share | टाटा ग्रुपच्या 4 स्टॉक्समध्ये आहे राकेश झुनझुनवाला यांची भागीदारी, तुम्ही सुद्धा खरेदी करणार का?

by nagesh
Tata Group Stocks | tata group stock titan company investment motilal oswal maintains buy rating target prices rakesh jhunjhunwala also invested

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाTata Group Share | राकेश झुनझुनवाला यांचा पोर्टफोलिओ (Rakesh Jhunjhunwala Portfolio) किरकोळ गुंतवणूकदार आणि बाजार निरीक्षक बारकाईने पाहतात, कारण त्यांना यावरून समजते की स्मार्ट पैसा कोणत्या दिशेला वाढत आहे. बिग बुलच्या पोर्टफोलिओमध्ये सुमारे तीन डझन लिस्टेड शेअर आहेत. दुसरीकडे, टाटा समूहाचे शेअर्स हे नेहमीच त्यांच्या आवडत्या शेअर्सपैकी एक राहिले आहेत. (Tata Group Share)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सध्या वॉरेन बफेट ऑफ इंडिया (‘Warren Buffett of India’) नावाने प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टाटा समूहाचे 4 मोठे शेअर्स आहेत. हे स्टॉक Titan Company, Tata Motors, Tata Communications and Indian Hotels Company च्या स्वरूपात आहेत.

 

Rakesh Jhunjhunwala यांच्या portfolio मध्ये टाटा समूहाच्या 4 शेअरचा समावेश –

1 Titan Company : Q3FY22 साठी टायटन कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांची कंपनीत भागीदारी आहे.
राकेश झुनझुनवाला यांच्याकडे Titan Company चे 3,57,10,395 शेअर्स आहेत, जे कंपनीच्या एकूण जारी पेड – अप भांडवलाच्या (total issued paid-up capital) 4.02 टक्के आहे.

त्याचप्रमाणे रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे 95,40,575 शेअर्स किंवा कंपनीतील 1.07 टक्के हिस्सा आहे.
गेल्या एका महिन्यात Titan च्या स्टॉकने त्यांच्या गुंतवणूकदारांना अल्फा रिटर्न दिला आहे.
गेल्या एका महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टीने शून्य रिटर्न दिला आहे, तर या टाटा कंपनीने या कालावधीत 4 टक्के रिटर्न दिला आहे. (Tata Group Share)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

2 Tata Motors : ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 या कालावधीसाठी Tata Motors च्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 3,92,50,000 शेअर्स आहेत, जे कंपनीच्या एकूण पेड – अप कॅपिटलच्या अंदाजे 1.18 टक्के आहे.
या कालावधीत 11 टक्क्यांहून जास्त घसरण झाल्यामुळे गेल्या एका महिन्यात या शेअरवर विक्रीचा दबाव होता.
दुसरीकडे, प्रमुख बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स आणि निफ्टी अनुक्रमे 1.50 टक्के आणि 1.25 टक्क्यांनी घसरले आहेत.

 

3 Tata Communications : चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत टाटा कम्युनिकेशन्सच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार,
राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 30,75,687 शेअर्स किंवा 1.08 टक्के हिस्सा आहे.
गेल्या एका महिन्यात राकेश झुनझुनवाला यांचा हा शेअर 5 टक्क्यांहून जास्त घसरला आहे.
तर 2022 मध्ये हा शेअर 20 टक्क्यांहून जास्त घसरला आहे.

 

4 Indian Hotels Company : हा टाटा समूहाचा हॉस्पिटॅलिटी स्टॉक आहे जो अनलॉक थीमवर वाढत आहे.
राकेश झुनझुनवाला यांच्या या शेअरने सुद्धा गेल्या एका महिन्यात अल्फा रिटर्नही दिला आहे.
या कालावधीत 4.30 टक्के रिटर्न दिला आहे. तर 2022 मध्ये त्यात सुमारे 10.50 टक्के वाढ झाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Tata Group Share | tata group 4 stocks of in which rakesh jhunjhunwala has stake will you also buy

 

हे देखील वाचा :

PAN-Aadhaar Link पासून ITR फायलिंग पर्यंत… या महिन्यात ‘ही’ 5 कामे करणे आवश्यक

PF Interest Rate | 6 कोटी कर्मचार्‍यांना मोठा झटका ! PF वर मिळणार 40 वर्षातील सर्वात कमी व्याज, घटविले व्याजदर

Advocate Praveen Chavan | छुपा कॅमेरा कोणी लावला? देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांबद्दल अ‍ॅड. प्रवीण चव्हाणांचा मोठा खुलासा, म्हणाले…

 

Related Posts