IMPIMP

TET Exam Scam | राज्यातील तब्बल 7800 शिक्षक बोगस? अपात्र उमेदवार पैसे देऊन झाले पास ! शिक्षण विभागात मोठी खळबळ, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले…

by nagesh
Pune Crime | Sunil Gaikwad deported from Pune district for two years Loni Kalbhor Police Station CP Amitabh Gupta

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन TET Exam Scam | मागील काही दिवसांपासून शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात (TET Exam Scam) रोज समोर
येणार्‍या नवीन माहितीमुळे राज्यात खळबळ उडाली होती. दरम्यान, आता एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता
परीक्षा 2021 म्हणजेच टीईटीसाठी अपात्र ठरलेल्या 7 हजार 800 परीक्षार्थींना पैसे घेऊन उत्तीर्ण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली
आहे. या 7 हजार 800 उमेदवारांकडून पैसे घेऊन पास केलं आहे. पुणे सायबर पोलिसांच्या (Pune Cyber Police) तपासामध्ये ही बाब समोर आली
आहे. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबत पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta) यांनी
पत्रकारांशी संवाद साधला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

2018 आणि 2019 च्या टीईटी परीक्षेत मोठ्या प्रमाणात हा गैरव्यवहार (TET Exam Scam) झाला आहे. राज्य परीक्षा परिषदेकडून आलेला मूळ
निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल याची पडताळणी सायबर पोलिसांकडून करण्यात आली आहे. टीईटी परीक्षेत घोटाळेबाजांनी
उमेदवारांकडून 50 ते 60 हजार रुपये घेऊन त्यांना पात्र ठरवल्याचं उघडकीस आलं आहे.

दरम्यान, 2019-20 च्या परीक्षेत एकूण 16 हजार 592 जणांना पात्र असल्याचा निकाल लावण्यात आलेला होता. मात्र पोलिसांनी प्रत्यक्ष निकाल पडताळून पाहिल्यानंतर तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थी हे अपात्र असल्याचं समोर आलं. असं असतानाही या सर्वांना पात्र ठरवण्यात आलं आहे. पुणे सायबर पोलिसांच्या (Pune Cyber Police) तपासानंतर ही बाब लक्षात येताच शिक्षण विभागात (Department of Education) मोठी खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | मटक्याच्या केसमध्ये कारवाई न करण्यासाठी 20 हजारांची लाच घेताना API निंबाळकर आणि महमद अली अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime | भारती विद्यापीठ परिसरात रोड रोमियोचा भररस्त्यात धुडगुस ! महिलांच्या मांडीवर जाऊन बसणार्‍या दोघांना अटक

Pune Corporation | रस्त्याच्या डांबरीकरणासाठीच्या वर्गीकरणावरून भाजपच्या दोन पदाधिकार्‍यांमध्ये ‘ठिणगी’

Related Posts