IMPIMP

कोरोना निर्बंधाविरोधात ठाकरे सरकारला ‘या’ मंत्र्याचा ‘घरचा आहेर’, आकडेवारीनिशी आपल्याच सरकारचे काढले वाभाडे

by pranjalishirish
thakur criticize thackeray over corona rents out his own government statistics atul bhatkhalkar

मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसचा Corona उद्रेक कायम आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता राज्यातील सर्वच दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावरून विरोधकांकडून विरोध केला जात आहे. त्यानंतर आता ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यानेच निर्बंध शिथिल करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

फक्त शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा देण्याची जबाबदारी आहे का ?

राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीमध्ये कोरोना व्हायरसचा Corona संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यासाठी पत्र लिहिले आहे. या पत्रावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली. त्यांनी ट्विट करून म्हटले, की ‘ठाकूर यांनी ठाकरेंना हाणले…ठाकरे मंत्रिमंडळातील मंत्री यशोमती ठाकूर यांनी आकडेवारीनिशी आपल्याच सरकारचे वाभाडे काढले आहे. कोणताही अभ्यास न करता सरसकट लॉकडाऊन कसा अन्यायाने लादला आहे हे दर्शविणारे यशोमती ठाकूर यांचे पत्र म्हणजे ठाकरे सरकारला घरातून मिळालेली सणसणीत चपराक आहे…’

Pravin Darekar : ‘मुख्यमंत्र्यांचं मौन म्हणजे खुर्चीसाठी शांत बसणं अन्…’

दरम्यान, राज्य सरकारने कोरोनाचा Corona संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध लावण्याच्या नावाखाली लॉकडाऊन लावत जनतेची घोर फसवणूक केली आहे. रोज बदलणारे नियम, मंत्र्यांची परस्परविरोधी विधाने पाहता राज्य सरकारची परिस्थिती ‘कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नहीं’ अशी झाली असल्याची टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. त्यानंतर अतुल भातखळकर यांनीही सरकारवर निशाणा साधला.

Read More : 

Coronavirus Cases India : देशात पहिल्यांदा एका दिवसात नोंदली गेली संसर्गाची 1.07 लाख प्रकरणे, केंद्राने लोकांना केले ‘हे’ आवाहन

Mini Lockdown : ‘सरकारने आनंदाने लॉकडाऊन लावला नाही, ही नामुष्की ओढवली’, निर्बंधावर राऊतांचे ‘कडक’ मत

चित्रा वाघ-रुपाली चाकणकर यांच्यात रंगला ‘कलगीतुरा’ !

परमबीर सिंग NIA च्या कार्यालयात ! सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार

‘मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांवर नियंत्रण नाही, आता राजीनाम्यासाठी रांग लागेल’, केंद्रीय मंत्र्याचा दावा

‘त्या’ वक्तव्यावरुन संजय निरुपम यांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले -‘बहिरा नाचे आपन ताल…’

‘खा. प्रताप पाटील-चिखलीकरांची माणसे निवडून देऊ नका, भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल’; भाजपमधील गटबाजी उघड

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज शरद पवारांची भेट घेणार

पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपचे ‘स्टार’ प्रचारक कोरोनाबाधित

आ. शिवेंद्रराजे यांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘Lockdown लावून प्रशासनाकडून मोगलाई’

Related Posts