IMPIMP

Tips To Increase Child’s Height | मुलांची उंची वाढत नसेल तर आहे ‘या’ जीवनसत्वांची कमतरता..

by sachinsitapure
Tips To Increase Child’s Height

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – सध्याच्या काळात मुलांच्या वयानुसार उंची न वाढणे ही एक सामान्य समस्या झाली आहे (Tips To Increase Child’s Height). आपल्या मुलाची उंची त्याच्या मित्रांपेक्षा कमी असल्याने अनेक पालकांना सतत काळजी वाटते. मात्र आपल्या मुलांची उंची न वाढण्यामागे कोणकोणत्या उणिवा असू शकतात, हे समजून घेणे गरजेचे आहे. तज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे की, मुलांमध्ये सर्वात मोठी कमतरता म्हणजे व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची असते. व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम दोन्ही हाडे आणि स्नायूंसाठी खूप महत्वाचे आहेत. त्यांच्या कमतरतेमुळे मुलांचा शारीरिक विकास योग्य प्रकारे होत नाही. विशेषतः मुलांची उंची वाढण्यात अडथळे येतात. जाणून घेऊया जीवनसत्त्वांबद्दल आणि त्यांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी काही उपाय (Tips To Increase Child’s Height) –

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

व्हिटॅमिन डीची कमतरता (Vitamin D Deficiency)

व्हिटॅमिन डी हे अत्यंत महत्त्वाचे जीवनसत्व आहे. जे आपल्याला सूर्यप्रकाशातून मिळते. हाडे (Bones) आणि दातांसाठी (Teeth) व्हिटॅमिन डी खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मुलांच्या शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचा सर्वात जास्त परिणाम हाडांवर होतो (Vitamin D Deficiency Affects To Bone ). हाडांचा विकास नीट न झाल्यास मुलांच्या उंचीवरही परिणाम होतो. शरीरात ‘ड’ जीवनसत्त्व कमी असल्याने मुलांची हाडे पुरेशी मजबूत होत नाहीत. यामुळे उंची वाढण्यास अडथळा येतो आणि कधीकधी वाकड्या उंचीची समस्या देखील उद्भवू शकते. त्यामुळे, मुलांना पुरेसा सूर्यप्रकाश देणे आणि व्हिटॅमिन डी समृद्ध आहार देणे अत्यंत गरजेचे आहे (Tips To Increase Child’s Height).

कॅल्शियमची कमतरता (Calcium Deficiency)

कॅल्शियम हे हाडे आणि दातांसाठी खूप महत्वाचे आहे. बालपणात आपली हाडे आणि दात खूप वेगाने विकसित होत असतात.
या काळात मुलांना कॅल्शिअमची नितांत गरज असते. जेवणात कॅल्शियमचे प्रमाण कमी असल्यास मुलांच्या शरीरात कमतरता निर्माण होऊ शकते.
त्यामुळे हाडांचा विकास व्यवस्थित होत नाही आणि मुलांची उंचीही हळूहळू वाढते (Children’s Height).
काही प्रकरणांमध्ये उंची अजिबात वाढत नाही.
त्यामुळे मुलांची उंची निरोगी राहावी यासाठी कॅल्शियम युक्त आहार देणे अत्यंत आवश्यक आहे.

Related Posts