IMPIMP

Udayanraje Bhosale | शिवाजी महाराजांचा अपमान करण्यापूर्वी लाजा कशा वाटत नाहीत?: उदयनराजे भोसले

by nagesh
Udayanraje Bhosale | udayanraje bhosle slams bjp governor bhagatsingh koshyari shivaji maharaj

रायगड : सरकारसत्ता ऑनलाईन   छत्रपती शिवाजी महाराजांचा भाजप नेत्यांनी केलेला अपमान हा सध्या कळीचा मुद्दा आहे. त्यांच्या विरोधात
भाजप नेते, खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी रायगडावर एक सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्यांचा समाचार घेतला
आहे. शिवाजी महाराजांवर असे काही बोलताना त्यांना लाज वाटली पाहिजे होती, असे म्हणत उदयनराजे भोसलेंनी (Udayanraje Bhosale) परखड
शब्दांत राज्यपाल आणि भाजपाच्या संबंधित नेत्यांवर रायगडातून टीकास्त्र सोडले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आज आपल्यावर काय वेळ आली आहे? शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यासाठी आलो असतो, तर वेगळा आनंद झाला असता. पण, आपण काय
करतोय? शिवसन्मानाचा निर्धार करण्याची वेळ आपल्यावर आली आहे. या लोकांना लाजा वाटल्या पाहिजेत की, वैयक्तिक स्वार्थासाठी लोकांच्या
विचारात तुम्ही बदल केला. शिवाजी महाराजांचा आपण सन्मान करायला हवा हे बोलावे आणि सांगावे लागत आहे. हे बोलायची गरज आहे का? ते
अंतकरणातून आले पाहिजे, असे यावेळी भोसले म्हणाले.

 

लवकरच तारीख ठरवून आपण मुंबईच्या आझाद मैदानात जाऊन निदर्शन करायचे आहे. त्यासाठी सर्वांनी एक होणे गरजेचे आहे. कुठल्याही प्रकारे यात राजकारण येऊ देऊ नका. यामागे कुणाचाच स्वार्थ नाही. शिवाजी महाराजांचा अपमान यापुढे कुणी करून दाखवावा. काय होईल, ते आपल्या परीने आपण बघूनच घेऊ. शिवाजी महाराजांची विटंबना महाराष्ट्रात सुरू आहे. चित्रपट, लिखाण आणि वक्तव्ये यातून त्यांचा अपमान केला जात आहे. किती दिवस आपण शांत बसून सहन करायचे? काही लोक असल्या लोकांचे समर्थन करत आहेत. त्यातून आपल्या सोयीनुसार अर्थ काढून घेत आहेत, असे भोसलेंनी नमूद केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जसे या देशाचे राष्ट्रपती पद सर्वोच्च आहे, तसे राज्यात राज्यपाल हे सर्वोच्च पद आहे.
त्यामुळे लोकांच्या अंगवळणी पडले आहे की, या विकृतीमुळे सगळ्यांनी गृहीत धरले की, काही होणार नाही.
ते राज्यापाल आहेत. ही राजकीय मंडळी स्वत:च्या स्वार्थासाठी त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करतात.
लाज वाटली पाहिजे. मला राज्यपालांचे नाव घेऊन त्यांना मोठे करायची इच्छा नाही,
अशा शब्दांत भोसलेंनी राज्यपालांचा समाचार घेतला.

 

Web Title :- Udayanraje Bhosale | udayanraje bhosle slams bjp governor bhagatsingh koshyari shivaji maharaj

 

हे देखील वाचा :

Pune PMPML Accident | हडपसरमध्ये पीएमपीएमएलच्या बसचा अपघात; चालक गंभीर जखमी

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी विकास ढाकणे

Pune Doctor Attack Case | ‘डॉक्टर प्रोटेक्शन कायद्याची अंमलबजावणी करा;’ डॉक्टरांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कोंढव्यात रॅली

 

Related Posts