IMPIMP

Uddhav Thackeray On Amit Shah | उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्यावर नाव न घेता टीका, म्हणाले – कितीही अफजल खान आले तरी…

by nagesh
Uddhav Thackeray On Amit Shah | cm uddhav thackeray attacks amit shah in mumbai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Uddhav Thackeray On Amit Shah | सध्या शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटातील (Shinde Group) वादावर 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर नाव न घेता टीका  करताना म्हटले की, मला आई भवानी, न्यायदेवतेवर विश्वास आहे. विजय आपलाच होणार आहे. कितीही अफजल खान आले तरी घाबरणार नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आमदार कैलास पाटील (MLA Kailas Patil), खासदार ओमराजे निंबाळकर (MP Omraje Nimbalkar) यांच्या उपस्थितीत आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबाद (Osmanabad) येथील कार्यकर्त्यांना मातोश्री शिवबंधन (Shivabandhan) बांधले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना (Shiv Sainik) संबोधित करताना वरील वक्तव्य केले.

 

उद्धव ठाकरे म्हणाले, आई भवानीचा आशीर्वाद असल्यावर कितीही अफजल खान आले तरी घाबरणार नाही. दसर्‍याला आपण भेटणार आहोत. एक चांगली सुरूवात झाली आहे. न्यायालयात दुसरी केस सुरु आहे. माझा आई भवानीवर आणि सर्वोच्च न्यायालयावर (Supreme Court) विश्वास आहे. न्याय आपल्याला मिळणार.

 

ठाकरे म्हणाले, तुळजाभवानीच्या दर्शनाला मी येणारच आहे. मला धाराशिव जिल्ह्याचे कौतुक करायचे आहे.
कारण कैलासने काय पराक्रम केले सर्वांना माहिती आहे.
ओमराजे देखील कसे काम करतोय हे तुम्ही देखील पाहिले आहे.
जिथे लोकप्रतिनिधी घट्ट आहेत, तिथे शिवसैनिक घट्ट राहणारच. ज्यांना तुम्ही खस्ता खाऊन मोठे केले, ते खोक्यात गेले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Uddhav Thackeray On Amit Shah | cm uddhav thackeray attacks amit shah in mumbai

 

हे देखील वाचा :

Abdul Sattar | शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंची निवड; अब्दुल सत्तारांची माहिती

Nilesh Rane | भुजबळांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून आता निलेश राणेंचीही टीका, म्हणाले – पवार साहेबांसोबत असणार्‍यांना समजणार नाही…

Maharashtra Political Crisis | ठाकरेंना धक्का, शिंदेंना दिलासा! निवडणूक आयोगासमोर सुरु असलेल्या कार्यवाहीला स्थगिती नाही; कोर्टाचा निर्णय

 

Related Posts