IMPIMP

Uddhav Thackeray | ठाण्यात सभा लावा, हा मी आलोच, उद्धव ठाकरेंची ठाण्यात धडाडणार तोफ

by nagesh
Maharashtra Politics | eknath shinde camp rahul shewale deepak kesarkar targets uddhav thackeray over shivsena issue

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाइन यवतमाळमधील माजी मंत्री संजय देशमुख (Sanjay Deshmukh) आणि ठाण्याचे माजी महापौर संजय घाडीगावकर (Sanjay Ghadigaonkar) यांनी अनेक कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना उद्देशून भाषण केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

माझी भूमिका शिक्षकासारखी झाली आहे. कारण, विद्यार्थी बदलत असले तरी शिक्षक एकच आहे. शिवसेना संपवायला निघालेल्यांना कल्पना नव्हती, की ज्यावेळी शिवसेनेवर आघात झाले, तेव्हा ती दसपटीने नाहीतर शतपटीने मोठी झाली. ठाण्यात सर्वकाही चिडीचूप आहे, असे लोकांना वाटले. तसे चित्रच निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, आता सर्व चिडून पेटून उठले आहेत. सध्याच्या घडीला माझ्या हातात काही नसले, तरी माझ्या हातांना ताकद देण्याचे काम तुम्ही करत आहात. त्यामुळे तुम्ही येणाऱ्या काळात ठाण्यात सभा लावा, मी आलो असे समजा, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यावेळी म्हणाले.

 

 

तसेच महाराष्ट्रातील संस्कारी माणसांना जे झाले ते पटलेले नाही. ज्यांचा आपल्याशी संबंध येणार नाही,
तसे लोक आपल्यासोबत येत आहेत. वेगवेगळ्या धर्माचे लोक येत आहेत.
तुम्ही फक्त लढा, जे होत आहे, ते आम्हाला पसंत नाही,
असे मला लोक सांगत असल्याचे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
तसेच या देशातील लोकशाहीला वाचविण्याचा हा प्रयत्न असल्याचे देखील ठाकरे म्हणाले.

 

तसेच माझे पुढे काय होणार, शिवसेनेचे काय होणार, हे ठरविणारे तुम्ही लोक आहात.
मला त्याची चिंता नाही. मात्र, देशाचे काय होणार, देशात लोकशाही राहणार की नाही हा प्रश्न प्रत्येक नागरिकाने
स्वत:ला विचारला पाहिजे, असे ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Uddhav Thackeray | uddhav thackeray meeting in cm eknath shinde thane

 

हे देखील वाचा :

MP Supriya Sule | पुण्यात वाहतूक कोंडीत अडकल्या सुप्रिया सुळे, गाडीतून उतरत त्यांनी… (व्हिडिओ)

Uddhav Thackeray | यवतमाळचे संजय देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश करताच, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

Pune Crime | दिवाळीच्या पार्श्वभूमीवर FDA ची मोठी कारवाई, भेसळयुक्त गुजरात बर्फीचा मोठा साठा जप्त

Vaibhav Khedekar | मनसेच्या वैभव खेडेकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, अटकेची टांगती तलवार

 

Related Posts