IMPIMP

बेहिशेबी मालमत्ता प्रकरण: चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध ACB कडून FIR दाखल

by sikandershaikh
chitra-kishor-wagh

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन टीम – unaccounted property case | २०१६ मध्ये लाच मागितल्या प्रकरणी चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांना अटक करण्यात आली होती. किशोर वाघ यांच्याकडे एक कोटींहून अधिकची बेहिशोबी मालमत्ता असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणाचा तपास सुरू होता. आता या प्रकरणाच्या तपासादरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आता गुन्हा दाखल केला आहे. किशोर वाघ यांच्या विविध शहरात असलेल्या मालमत्तांपैकी ९० टक्के मालमत्ता ही बेहिशेबी मालमत्ता असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमक झालेल्या भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यासमोरील अडचणी आता वाढण्याची चिन्हे आहेत. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. आता पोलीस या प्रकरणी अधिक तपास करणार आहेत. “महाविकास आघाडी सरकारला त्यांच्याविरोधात बोललेले आवडत नाही. असे जर कुणी काही बोलले तर त्यांची जुनी प्रकरणे बाहेर काढली जातात. या प्रकरणात भाजपा हा चित्रा वाघ यांच्यासोबत आहे,” असे भाजपा नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले. या कारवाईवरून भाजपाने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतल्याने राजकीय सुडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे.

Related Posts