IMPIMP

Urfi Javed | प्रसिद्ध कॉमेडियनने केली उर्फी जावेद वर टीका; म्हणाला…

by nagesh
Urfi Javed | famous comedian sunil pal got angry at urfi javed fashion

सरकारसत्ता ऑनलाईन  टीम : उर्फी जावेद (Urfi Javed) म्हटलं की तिची अतरंगी फॅशन डोळ्यासमोर येते. तिच्या या फॅशननेच उर्फी ही नेहमीच चर्चेत असते. प्रत्येक वेळी तिचे नवनवीन लुक्स पाहून नेटकरी हैराण होत असतात. उर्फी (Urfi Javed) तिच्या या ड्रेसिंग सेन्समुळे अनेकदा ट्रोल ही झालेली आहे. आता कॉमेडियन सुनील पालने (Sunil Pal) उर्फी विषयी एक व्हिडिओ शेअर करत आपले मत मांडले आहे. सध्या सोशल मीडियावर सुनील पालने शेअर केलेला व्हिडिओ जोरात वायरल होत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सुनील पालने शेर केल्या व्हिडिओत म्हटले आहे, “उर्फी जावेद (Urfi Javed) तू वेडी झाली आहेस का? बरेच दिवसांपासून मी तुला पाहत आहे. मुद्दाम तुझ्यावर केस व्हावी अशी तुझी इच्छा होती. जेणेकरून तू चर्चेत यावी असे तुला वाटत होते. कमी कपडे घालून उर्फी जावेद हे नाव तू घेतले जे आमच्या पवित्र मुस्लिम नावाशी खेळत आहेस. ते मला अजिबात आवडलेले नाही. मला वाटते की आपण सर्वांनी मिळून या बहिणीला समजावून सांगितले पाहिजे शिक्षा नाही द्यायची तिला समजावून सांगितले पाहिजे की असे अंग प्रदर्शन केल्याने केवळ दोन-चार दिवसच प्रसिद्धी मिळते शिखरावर जाण्यासाठी कष्ट करावे लागतात मेहनत करून काम करावे लागते. न्यूज मध्ये राहण्यासाठी ती न्यूड होत चालली आहे. एका भावाच्या नात्याने मी सांगतोय घराच्या बाहेर येताना कपडे घाल”.

 

 

आता सुनील पालच्या या व्हिडिओला उर्फी जावेद काय प्रतिक्रिया देते हे पाहण्यासारखे असणार आहे.
नुकताच उर्फीने एका महिलेविरुद्ध तक्रार करत व्हिडिओ पोस्ट केला होता.
उर्फी तिच्या बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Urfi Javed | famous comedian sunil pal got angry at urfi javed fashion

 

हे देखील वाचा :

Adipurush Movie | ‘आदिपुरुष’ बाबत निर्मात्यांनी घेतला ‘हा’ सगळ्यात मोठा निर्णय

Har Har Mahadev | ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; पिंपरीतील विशाल थिएटरमध्ये शो बंद पाडला

Aditya Thackeray On Eknath Shinde Govt | ‘गद्दारांचं सरकार कोसळणार’; आदित्य ठाकरेंचे विधान

 

Related Posts