IMPIMP

Vasant More | ‘मतदारसंघातील मुस्लिमांशी माझी नाळ जोडली गेलीय, आता त्यांच्याच दारासमोर जाऊन भोंगे वाजवू का?’ – नगरसेवक वसंत मोरे

by nagesh
MNS Leader Vasant More | how close is my relationship with mns chief raj thackeray vasant more removed the old banner and showed it see video

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Vasant More | गुढीपाडवा मेळाव्या दरम्यान बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्यांदर्भात घेतलेल्या भूमिकेला विरोध करणाऱ्या माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांना मनसे पुणे शहराध्यक्ष (MNS Pune City President) पदावरुन काढून टाकण्यात आले. यामुळे पुण्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. यानंतर काही मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामा दिला. मात्र वसंत मोरे यांच्या पाठीशी कात्रज परिसरातील (Katraj Area) मुस्लीम समुदाय रस्त्यावर उतरला आहे. यानंतर वंसत मोरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

वसंत मोरे (Vasant More) माध्यमांशी बोलताना भावूक झाले आहेत. त्यावेळी वसंत मोरे म्हणाले की, ”राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मला ज्याची भीती होती तेच झालं. हे सगळे मुस्लीम बांधव 2007 पासून माझ्यासोबत आहेत. एका हिंदू व्यक्तीच्या पाठिशी ते इतकी वर्षे उभे आहेत. आमच्याकडे हिंदू-मुस्लिम असा विषयच नाही. या सगळ्यांशी माझी नाळ जोडली गेली आहे. आता मी यांच्या दारात जाऊन भोंगे वाजवायचे, काहीतरी भूमिका घेऊन त्यांच्याशी वाद घालायचे का ? हीच गोष्ट मी परखडपणे सांगितली. त्यानंतर मला ज्याची भीती होती, तेच झालं.”

 

 

पुढे बोलताना वसंत मोरे यांनी सांगितलं की, ”हकालपट्टी हा विषय मला खूप लागला आहे. माझी हकालपट्टी होऊ शकत नाही. मी स्वत:हून राजसाहेबांना एक महिन्यात मी पद सोडेन, असं सांगितले होते. तरीही माझी हकालपट्टी करण्यात आली, अशी नाराजी वसंत मोरे यांनी व्यक्त केली. मनसे पक्षासाठी मी 27 वर्षे दिली. जे कार्यकर्ते माझ्यासोबत मोठे झाले, आता त्यांच्यात आणि माझ्यात दुफळी निर्माण केली जातेय. यामुळे मला काल रात्रभर झोप लागली नाही. उद्या मी अपक्ष म्हणून उभा राहिलो तरी हे लोक मला निवडून देतील. या लोकांशी मी संबंध तोडू शकत नाही.” असं ते म्हणाले.

 

Web Title: Vasant More | how can i speak against muslim community vasant more asks mns chief raj thackeray

 

हे देखील वाचा :

Acidity Treatment | उन्हाळ्यात अ‍ॅसिडिटीचा पक्का उपचार करण्यासाठी 5 जबरदस्त उपाय, पोट निरोगी राहिल्याने होतात अनेक फायदे

Police Hawaldar Suicide | पोलीस हवालदाराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Pune Crime | MBBS ला प्रवेश देण्याच्या बहाण्याने 13 जणांची 2.53 कोटींची फसवणूक

Pune Crime | ‘आम्ही कात्रजचे भाई आहोत’, पुण्यात भरदिवसा टोळक्याचा धुडगूस, कात्रज चौकातील गाड्यांची केली तोडफोड

 

Related Posts