IMPIMP

Vicky Kaushal | विकी कौशलचा भन्नाट डान्स व्हिडिओ व्हायरल; बायकोच्या ‘या’ गाण्यावर केला डान्स*

by nagesh
Vicky Kaushal | vicky kaushal danced on katrina kaifs famous item song chikani chameli

सरकारसत्ता ऑनलाईनटीम – मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय जोडींमध्ये अभिनेता विकी कौशल (Actor Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कटरीना
कैफ (Actress Katrina Kaif) यांचे नाव आवर्जून घेतले जाते. सध्या विकी त्याच्या आगामी चित्रपट ‘गोविंदा मेरा नाम’ मुळे चर्चेत आहे. त्याचबरोबर हे
दोघेही एकमेकांच्या कामाचे भरभरून कौतुक करतानाही दिसतात. याआधी विकीने अनेक मुलाखतींमध्ये कॅटरिनाच्या कामाचा चाहता असल्याचे
सांगितले आहे. तर सध्या विकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विकीने (Vicky Kaushal) एका कार्यक्रमात कॅटरिनाच्या
गाजलेल्या आयटम सॉंगवर ठेका धरला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गोविंदा नाम मेरा या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी या ट्रेलरला भरभरून प्रेम दिले यातच विकी या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. तर एका कार्यक्रमात त्यांनी कॅटरिना कैफच्या ‘चिकनी चमेली’ या गाण्यावर नाच देखील केला आहे. सध्या त्याच्या या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ ‘गोविंदा मेरा नाम’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्चच्या वेळेचा असल्याचे सांगितले जात आहे.

 

 

यावेळी स्टेजवर विकी सोबत भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी (Bhumi Pednekar, Kiara Advani) देखील दिसत आहेत. तर विकीने ‘चिकनी चमेली’ या गाण्यांची हुकअप स्टेप केली आहे. यावेळी तो अत्यंत आनंदी असल्याचे दिसत आहे. तर त्याच्या डान्सवर प्रेक्षकही फिदा झाल्याचे दिसत आहेत. सोशल मीडियावर या व्हिडिओला आतापर्यंत अनेक व्ह्यूज आणि कमेंट्स देखील आले आहेत.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

‘गोविंदा मेरा नाम’ हा चित्रपट 16 डिसेंबर रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार वर प्रदर्शित होणार आहे.
शशांक खैतान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने याची निर्मिती केली आहे.
पहिल्यांदाच हे तीन कलाकार एकत्र काम करताना दिसणार आहेत.
या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुरता लागली आहे.

 

Web Title :- Vicky Kaushal | vicky kaushal danced on katrina kaifs famous item song chikani chameli

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | चेकचा दुरुपयोग करुन पुतण्याने केली काकाची 3 कोटींची फसवणूक; पिंपरी-चिंचवडमधील घटना

Pune Crime | सराईत वाहन चोराला गुन्हे शाखेकडून अटक, 21 गुन्हे उघड

MP Vinayak Raut | खा. प्रतापराव जाधवांच्या गौप्यस्फोटाला खा. विनायक राऊतांचा पलटवार; म्हणाले,”ज्या पद्धतीने कावीळ झालेल्या व्यक्तींना सगळीकडे पिवळे दिसते, त्याच पद्धतीने…”

Maharashtra Government Recruitment | 75 हजार पदांच्या भरतीसाठी सरकारचे संबंधित विभागांना नवे आदेश, परीक्षेसंबंधीच्या अटीशर्ती जाहीर

 

 

Related Posts