IMPIMP

Vir Das | ‘भारतात दिवसा महिलांची पूजा, रात्री त्यांच्यावर बलात्कार’; कॉमेडियन वीर दासच्या कवितेवरून नवा वाद

by nagesh
Vir Das | comedian vir das brutally trolled for his monologue about two indians at kennedy center Washington DC

सरकारसत्ता ऑनलाइन  – कॉमेडियन वीर दासने (Vir Das) वॉशिंग्टन डीसीमधील (Washington DC) केनेडी सेंटरमध्ये (Kennedy Center) भारताबद्दल सादर केलेल्या कवितेवरून (Poem) नवा वाद निर्माण झाला आहे. ‘टू इंडियन्स’ (Two Indians) असे या कवितेचे शीर्षक आहे. या कवितेमध्ये कॉमेडियन वीर दासने (Vir Das) भारताच्या दोन विविध रुपांचं वर्णन केलं आहे. या कवितेतील काही ओळींवरून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

हा व्हिडीओ युट्यूबवर पोस्ट केल्यानंतर वीर दासने (Vir Das) भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे.
या कवितेमधील “मी अशा भारतातून आलो आहे जिथे आम्ही दिवसा महिलांची पूजा करतो आणि रात्री त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला जातो,” या ओळींवर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे.

 

 

वीर दासचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
तसेच वीर दास यांच्या विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयातील वकील आणि भाजप-महाराष्ट्राचे कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. आशुतोष जे दुबे (Add. Ashutosh J. Dubey)
यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून वीर दासविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीची प्रत शेअर केली आहे.

 

 

 

 

Web Title : Vir Das | comedian vir das brutally trolled for his monologue about two indians at kennedy center Washington DC

 

हे देखील वाचा :

Rajkumar Rao | राजकुमार रावच्या विवाहसोहळ्यात जाऊन ‘या’ बड्या नेत्याने दिल्या जोडप्याला शुभेच्छा !

T20 World Cup 2022 Schedule | पुढील T-20 वर्ल्ड कपच्या तारखा झाल्या जाहीर; जाणून घ्या कोणत्या संघाना मिळाली थेट ‘एंट्री’

Urfi javed | नेटच्या कपड्यांमुळे उर्फी जावेदची काळी ब्रालेट झाली फ्लाॅन्ट, पाहा उर्फीचे हाॅट फोटो

 

Related Posts