IMPIMP

Welspun Corp Share | ₹ 5000 कोटीची ऑर्डर मिळाल्यानंतर ‘या’ कंपनीचे शेअर बनले रॉकेट, 19% पर्यंत वाढले स्टॉक

by Team Deccan Express
Welspun Corp Share | welspun corp share jump 19 percent today after win 5000 crore rupees biggest order

नवी दिल्ली : वेलस्पन कॉर्पचे शेअर्स (Welspun Corp share) शुक्रवारी तेजीत होते. इंट्राडे (Intraday) मध्ये कंपनीचे शेअर्स जवळपास 19% वाढले. वेलस्पन कॉर्पचे शेअर्स दुपारी 2:11 वाजता 18.36% वाढून 247.25 रुपयांवर व्यवहार करत होते. ही त्याची 52 आठवड्यांची हाय शेअर प्राईस (High Share Price) आहे. (Welspun Corp share)

 

कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्यामागे एक मोठे कारण आहे. ते म्हणजे, या स्टील उत्पादन निर्मात्या कंपनीने युनायटेड स्टेट्समध्ये पाईप पुरवठ्यासाठी (Order For Pipe Supply) सुमारे 5000 कोटी रुपयांची सर्वात मोठी ऑर्डर मिळवली आहे (Welspun Corp share).

 

काय आहे ऑर्डर

पर्मियन बेसिनपासून ह्यूस्टनपर्यंत नॅचरल गॅसची वाहतूक करण्यासाठी 325,000 मेट्रिक टन कोटेड पाईप्सचा पुरवठा करणे अशी या ऑर्डरची व्याप्ती आहे. ऑर्डरसाठीचे पाईप कंपनीच्या यूएसमधील लिटल रॉक प्लांटमधून बनवले जातील.

 

34% वाढला शेअर

गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये कंपनीचा शेअर 34.59% वाढला. 16 मे रोजी शेअरची किंमत 183.70 रुपये होती. या वर्षी आतापर्यंत स्टॉक 39.10% वाढला आहे.

 

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केट मधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Welspun Corp Share | welspun corp share jump 19 percent today after win 5000 crore rupees biggest order

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

Related Posts