IMPIMP

सावधान ! WhatsApp वर ‘या’ नंबरवरून आला असेल मेसेज तर चुकूनही करू नका Reply, होऊ शकता कंगाल

by nagesh
WhatsApp | whatsapp scam dangerous whatsapp fake lottery message with amitabh bachchan kbc pictures beware

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाWhatsApp | सोशल मीडिया आणि चॅटिंग अ‍ॅप्स हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. कनेक्टेड राहण्यासाठी आणि एकमेकांशी बोलण्यासाठी अनेक अ‍ॅप्स आणि प्लॅटफॉर्म्स आहेत, परंतु सहसा प्रत्येकजण व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) वापरतो (WhatsApp Scam Latest 2022 Fake Lottery Message).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

व्हॉट्सअ‍ॅपने आपले जीवन सोपे केले आहे, पण तेवढेच धोकादायकही केले आहे. काही काळापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर दिसलेला स्कॅम (Scam) पुन्हा एकदा समोर आला आहे. तुम्ही हा स्कॅम आणि यासारखे इतर स्कॅम कसे टाळू शकता ते देखील जाणून घेवूयात.

 

WhatsApp वर या नंबरच्या मेसेजला देऊ नका रिप्लाय !
व्हॉट्सअ‍ॅपवर एक स्कॅम (WhatsApp Scam) सुरू आहे, ज्यामध्ये यूजर्सना आकर्षक मेसेज पाठवले जात आहेत. WhatsApp वर +92 306 0373744, या नंबरवरून यूजरला लॉटरी जिंकल्याचा संदेश पाठवला जात आहे.

या संदेशासोबत व्हॉईस नोटही पाठवली जात आहे. हे संदेश अस्सल दिसण्यासाठी, घोटाळेबाज अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची छायाचित्रे आणि कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) म्हणजेच केबीसी (KBC) चे नाव वापरत आहेत.

 

मेसेजमध्ये लिहिले आहे असे…
लॉटरी मेसेजमध्ये लिहिलेले असते की, तुम्ही 25 लाखांची लॉटरी जिंकली आहे आणि हे पैसे तुमच्या खात्यात लगेच जमा होतील.

इतकेच नाही तर ज्या मेसेजवर तुम्हाला कॉल करायचा आहे त्यात ’07666533352’ हा नंबर देण्यात आला आहे. मेसेजसोबत एक ऑडिओ नोटही दिली जात आहे ज्यामध्ये तुम्ही लॉटरीचे पैसे तुमच्या बँक खात्यात कसे ट्रान्सफर करू शकता हे सांगितले आहे.

हा एक धोकादायक स्कॅम आहे. या मेसेजला प्रत्युत्तर देणे तुमच्यासाठी खूप वाईट ठरू शकते कारण त्याद्वारे हे स्कॅमर तुमच्या बँक अकाऊंटचे तपशील चोरतात आणि तुम्ही तुमचे सर्व पैसे गमावू शकता.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

हा स्कॅम कसा ओळखावा
असे स्कॅम कसे ओळखावे हा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो.
येथे आम्ही तुम्हाला तीन महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्यावरून तुम्ही घोटाळा सहज ओळखू शकता.

सर्वप्रथम, जर तुम्हाला अनोळखी नंबरवरून संदेश आला तर, विचार न करता प्रतिसाद देऊ नका.
नंबर तपासणे खूप महत्वाचे आहे.

तसेच, जर तुम्हाला असा मेसेज आला की ज्यामध्ये तुम्ही कुठेतरी पैसे जिंकले आहेत किंवा तुम्हाला पैसे मिळतील,
तर समजून घ्या की हा स्कॅमर्सने लावलेला सापळा आहे. तुम्ही मेसेजच्या भाषेवरूनही अंदाज लावू शकता की मेसेज खरा आहे की खोटा.

 

Scams पासून बचाव करण्याचे मार्ग
1.
एखाद्या अनोळखी नंबरवरून मेसेज आला असेल किंवा हा मेसेज तुम्हाला फसवण्यासाठी पाठवला गेला असेल असे वाटत असेल तर सर्वप्रथम तो नंबर ब्लॉक करा.

2. जर असा मेसेज तुम्हाला गैर-भारतीय क्रमांकावरून आला तर त्यावर विशेष लक्ष द्या आणि उत्तर देऊ नका.

3. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.

4. तुमच्या फोनवर मिळालेला ओटीपी (OTP) कोणाशीही शेअर करू नका.

5. असे मेसेज तुमच्याकडे आले तर ते इतर कोणालाही फॉरवर्ड करू नका.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :- WhatsApp | whatsapp scam dangerous whatsapp fake lottery message with amitabh bachchan kbc pictures beware

 

हे देखील वाचा :

Exercise To Reduce Belly Fat For Women | कोणत्या वेळी एक्सरसाईज केल्याने लवकर कमी होते फॅट, रिसर्चमध्ये झाला खुलासा

High BP-Heart Disease And Cholesterol | Harvard च्या डॉक्टरांचा दावा – ‘कोलेस्ट्रॉल आणि हाय ब्लड प्रेशरचा ठोस उपचार आहे ‘हे’ भारतीय फळ’

Ajit Pawar | अजित पवारांचा भांडखोर महंतांना जोरदार टोला; म्हणाले – ‘..यांचा राडा पाहून हनुमानही डोक्यावर हात मारून घेत असेल’

 

Related Posts