IMPIMP

Winter Session | सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव निलंबित

by nagesh
Winter Session | solapur zilla parishad health officer dr shitalkumar jadhav suspended

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – Winter Session | सोलापूर जिल्हा परिषदेचे (Solapur Zilla Parishad) जिल्हा आरोग्य अधिकारी (District Health Officer) डॉ. शितलकुमार जाधव यांना निलंबित (Dr. Shitalkumar Jadhav suspended) करण्यात आले आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) ही घोषणा केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सोलापूर जिल्ह्यात लोकसंख्या व अंतराच्या निकषानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health Center) आणि उपकेंद्र (Sub-Centre) यांची किती आवश्यकता आहे. याचा परिपूर्ण आराखडा सादर न केल्यामुळे डॉ. शितलकुमार जाधव यांना निलंबित करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. शासन स्तरावरील प्रशासनाकडून वारंवार पत्र देऊन प्रस्ताव मागवून देखील प्रस्ताव सादर केले नाही. त्यामुळे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ही कारवाई केल्याचे अधिवेशनात (Winter Session) सांगितले.

 

डॉ. जाधव हे सोलापूर येथे सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कृष्ठरोग) येथे कार्यरत होते.
परंतु, कोरोना काळात त्यांच्याकडे सोलापूर शहर आरोग्य अधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
दरम्यान, त्यांनी केलेल्या विनंतीनुसार सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली.
याचा शासन निर्णय 29 सप्टेंबर 2020 रोजी प्राप्त झाला होता. तेव्हापासून आज पर्यंत ते या पदावर कार्यरत होते.

 

 

Web Title :- Winter Session | solapur zilla parishad health officer dr shitalkumar jadhav suspended

 

हे देखील वाचा :

Tanaji Sawant | राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राचा सर्वंकष आराखडा बनविणार; सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांची विधानपरिषदेत माहिती

LIC Policy | LIC ची ही योजना काही वर्षांतच बनवते लखपती, मॅच्युरिटीनंतर मिळतील २८ लाख रुपये

Resham Tipnis | ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; पोस्ट शेअर करत दिली माहिती

 

Related Posts