IMPIMP

Lockdown in Maharashtra : लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री आजच मोठा निर्णय घेणार – मंत्री अस्लम शेख

by pranjalishirish
coronavirus cm uddhav thackeray take big decision today aslam sheikhs suggestive statement regarding lockdown

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाने हाहाकार केला असून, अनेक जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी राज्यात लॉकडाऊन Lockdown लागणार का यावरून राज्यात चर्चेला उधाण आले आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लॉकडाऊनबाबत आजच निर्णय घेणार आहेत. तर लॉकडाऊनबाबत आजच नियमावली जारी करण्यात येणार असल्याचं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी याबाबत माहिती दिली आहे.

प्रसिध्द गायक आनंद शिंदेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले – ‘हे पवार साहेबांचे सरकार हाय, तुमच्या बापाच्याने पडणार नाय’

अस्लम शेख म्हणाले, आम्हाला कोरोनाची चेन ब्रेक करायची आहे, लोकांना सोबत घेऊन, त्यांचे सल्ले घेऊन याबाबत आम्हाला निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी एक चांगली एसओपी लागू करायची आहे. मला असं वाटतं की, आजच याबाबतची नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्र राज्यात आजही परिस्थिती नियंत्रणात आहे, असे ते म्हणाले, महाराष्ट्रात खासगी रुग्णालयात वेटिंग लिस्ट आहे. मात्र सरकारी हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटरमध्ये अजूनही बेड आणि ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत, असे अस्लम शेख यांनी सांगितले आहे.

रेमडेसीविरसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने भाजप नेत्याचा नंबर केला शेअर, पोलिसात तक्रार

या दरम्यान, लॉकडाऊन Lockdown बाबत बोलताना अस्लम शेख म्हणाले, बैठकीवेळी कोरोनाच्या टास्क फोर्समधील काही जणांनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा सल्ला दिला होता. काही जणांनी एवढ्या लॉकडाऊनमुळे त्रास होईल असे म्हटले होते. काही जणांनी १४ दिवसांच्या तर काही जणांनी ८ दिवसांच्या लॉकडाऊनची Lockdown  घोषणा करावी असा सल्ला दिला आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या रुग्णांपर्यंत पोहोचले जात आहे. परंतु, काही राज्ये कोरोनाचे रुग्ण लपवत आहेत. त्यांच्याकडे १५ दिवसांनंतर बिकट परिस्थिती निर्माण होणार असल्याचाही इशारा अस्लम शेख यांनी दिला आहे.

Read More : 

Balasaheb Thorat : आज-उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घोषणा करतील, 14 दिवसांच्या Lockdown शिवाय पर्याय नाही

पुणे जिल्हयात कपांऊडर 2 वर्षापासून चालवत होता मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल

देवेंद्र फडणवीसांचा राष्ट्रवादीवर घणाघात, केला ठाकरे सरकारवर ‘हा’ गंभीर आरोप

पंढरपूर पोटनिवडणूक : ‘तुम्ही पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवावी’, सदाभाऊंचा जयंत पाटलांना टोला

‘महाराष्ट्रात लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही, फडणवीसांचा टोला

‘प्राण जाये पर वचन न जाये’, असं उद्धव ठाकरेंचं कार्य’, मुख्यमंत्र्यांची पाठराखण

..हे तर ‘महावसूली’ सरकार अन् ‘जिथं जाऊ तिथं खाऊ’ ही मंत्र्यांची कामे : फडणवीस

‘महाराष्ट्रात लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही, फडणवीसांचा टोला

…तर मग रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार का ?, भाजपचा सवाल

‘हा’ केंद्र सरकारचा अमानुषपणा आहे, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात

Related Posts