IMPIMP

LIC च्या खास योजनेतून मिळतील महिन्याला 16 हजार रुपये, मग आताच करा गुंतवणूक

by sikandershaikh
note

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)भारतीय जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (lic policy) आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच चांगल्या योजना आणत असते. आताही अशीच खास योजना एलआयसीने आणली आहे. विशेष म्हणजे ९० दिवस ते ५५ वर्षे वयोगटातील लोकांसाठी ही एक एन्डॉयमेंटसह जीवन विमा योजना आहे. या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्टय म्हणजे वयाच्या १०० वर्षांपर्यंत ही योजना कव्हर करते. या पॉलिसीच्या मॅच्युअरिटीची रक्कम १०० वर्षे पूर्ण झाल्यावर मिळेल. एलआयसी जीवन उमंग योजना असं या खास योजनेचं नाव असून जर पॉलिसीधारकाचा अचानक मृत्यू झाला तर त्याने भरलेला सर्व प्रीमियम नामित व्यक्तीला परत केला जाईल. तसेच या योजनेतील प्रीमियम पेमेंट कालावधीनंतर विमाराशीच्या ८ टक्के रक्कम आयुष्यासाठी किंवा १०० वर्षे वयापर्यंत दिली जाते. जर एखाद्याने हि पॉलिसी घेतली आणि वयाची १०० वर्षे पूर्ण केली तर कंपनी त्याला एकरकमी रक्कम विमाधारकास देईल. त्याचबरोबर वयाच्या १०० वर्षी पॉलिसीधारकास सम अ‍ॅश्युअर्ड, सिंपल रिव्हर्शनरी बोनस आणि अंतिम एडिसन बोनस दिला जाईल.

इनकम टॅक्सवरही सूट

या योजनेत एलआयसीने (lic policy) चार पर्याय दिले आहेत. यामध्ये १५, २०, २५ आणि ३० वयापर्यंत लोक याचा फायदा घेऊ शकतात.
जर यामध्ये कोणाला गुंतवणूक करायची असेल तर किमान दोन लाखाचा विमा घ्यावा लागेल.
या योजनेचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे ८० सी अंतर्गत तुम्हाला १.५ लाख रुपयांपर्यंतच्या प्रीमियमवर आयकरामध्येही सूट मिळणार आहे.

९९ वर्षांसाठी दरमहा मिळतील पैसे

जर कोणी २५ वर्षाचे असेल आणि त्याने २५ वर्षासाठी दोन लाखाचा विमा घेतला तर तुम्हाला २५ वर्षे
प्रीमियम भरावा लागेल. म्हणजेच वर्षाकाठी ८ हजार ४०० रुपये.
२५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याला दरवर्षी एकूण ठेवींपैकी आठ टक्के रक्कम म्हणजे १६ हजार रुपये मिळणे सुरू होईल.
९९ वर्षे हि रक्कम मिळत जाणार असून १०० वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्हाला २१ लाख रुपये दिले जातील.

Related Posts