IMPIMP

  नोकरदारांसाठी मोठी बातमी ! लवकरच पगारातील PF कपात वाढणार, जाणून घ्या काय आहे सरकारचा प्लॅन

by omkar
PF
नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन – नोकरदार लोकांसाठी मोठी बातमी आहे. तुमच्या पगारातून सध्या जेवढा प्रॉव्हिडंट फंड PF कापला जातो त्यापेक्षा जास्त कापला जाईल. केंद्र सरकार लवकरच नवीन लेबर कोड लागू करणार आहे. नवीन लेबर कोड लागू झाल्यानंतर कर्मचार्‍यांची इन हँड सॅलरी कमी होईल आणि पीएफ PF वाढेल.
अगोदर हा कोड 1 एप्रिल 2021 पासून लागू केला जाणार होता, परंतु काही कारणामुळे तो पुढे ढकलला. सरकार आता तो येत्या 2 किंवा 3 महिन्यात लागू करू शकते.

WHO चा भारताला इशारा ! डेल्टा व्हेरिएंटचा उल्लेख करून म्हटले – ‘घाईगडबडीत हटवू नयेत प्रतिबंध’

टेक होम सॅलरी कमी होणार

नवीन लेबर कोडमध्ये कर्मचार्‍यांच्या टेक होम सॅलरीत कपात केली जाणार आहे आणि पीएफ योगदान वाढेल. यामध्ये ग्रॅच्युटी वाढण्याची शक्यता आहे. मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, एकदा वेज कोड लागू झाल्यानंतर, कर्मचार्‍यांचा मुळ पगार आणि प्रॉव्हिडेंट फंडच्या हिशेबाच्या पद्धतीत बदल होतील.

कोणते 4 लेबर कोड होणार लागू

सरकार जे 4 लेबर कोड लागू करण्याचा विचार करत आहे, त्यामध्ये इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड, कोड ऑन ऑक्यूपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडीशन्स कोड आणि सोशल सिक्युरिटी कोड ऑन वेजेसचा समावेश आहे.

काय आहे न्यू वेज कोड

वेज कोड अ‍ॅक्ट, 2019 नुसार आता कोणत्याही कंपनीमध्ये कर्मचार्‍याची बेसिक सॅलरी कंपनी खर्चा (सीटीसी)च्या 50 टक्केपेक्षा कमी होऊ शकत नाही.

नवीन कोड लागू झाल्यानंतर तुमच्या सीटीसीच्या 50 टक्के बेसिक सॅलरीच्या रूपात मिळेल.

जर असे झाले तर भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि ग्रॅच्युटीमधील योगदान वाढेल.

याशिवाय न्यू वेज कोड लागू झाल्यानंतर बोनस, पेशन, वाहन भत्ता, घरभाडे, हाऊसिंग बेनिफिट, ओव्हरटाइम इत्यादी सॅलरीतून बाहेर होतील.

सॅलरीमध्ये केवळ 3 घटक असणार

नव्या कोडमध्ये तुमच्या सॅलरीत केवळ 3 घटकांचा समावेश केला जाईल. यामध्ये पहिला आहे बेसिक पे, दुसरा डीए असेल आणि तिसरा रिटेन्शन पेमेंट कॉम्पोनंन्ट असेल. बेसिक सॅलरी वगळता सीटीसीमध्ये समाविष्ट केलेले काही इतर घटक 50 टक्केपेक्षा जास्त नसावेत आणि इतर अर्ध्यात बेसिक सॅलरी असावी.

Also Read:- 

शिरूर महसुल अधिकाऱ्यांच्या शासकीय कामात अडथळा करणारा वाळु तस्कर अखेर LCB कडून अटकेत; 7 महिन्यापासून होता फरार

PM मोदींच्या भेटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला रवाना !

8 जून राशीफळ : ‘या’ 4 राशींनी राहावे सावध, धनहानीचे संकेत, इतरांसाठी असा आहे मंगळवार

PM मोदींची मोठी घोषणा ! केंद्र सरकार 18 वर्षावरील सर्वांचं लसीकरण मोफत करणार

हसन मुश्रीफांचा गंभीर आरोप, म्हणाले- मोदी सरकारने तंबी दिल्याने अदर पुनावाला लंडनला जाऊन बसले

Sachin Vaze | नालेसफाई करणार्‍या कंत्राटदाराकडून पैसे वसूल करण्याची जबाबदारी वाझेवर होती, भाजपकडून आरोप

Web Title : Big news for employees! Soon the PF cut in salaries will increase, find out what is the government’s plan.

Related Posts