IMPIMP

Maharashtra Budget 2021 : अजित पवारांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा

by amol
maharashtra budget 2021 important announcements made finance minister ajit pawar maharashtra budget

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी दुसरा अर्थसंकल्प आज सभागृहात सादर करत असताना, यावेळी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत, यामध्ये तीन लाखापर्यंत पीककर्ज घेणाऱ्या नियमित कालावधीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज न घेता कर्ज देण्यात येणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बळकटीकरणासाठी चार वर्षासाठी २ हजार कोटींची तरतूद करण्यात आली. Ajit Pawar तर राज्यात आरोग्य सेवांसाठी ७,५०० कोटींची तरतूद केली आहे. तसेच नागरी आरोग्य कार्यालयाची निर्मिती करणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी दिली आहे.

काय आहेत घोषणा? जाणून घ्या-

– आरोग्य सेवांसाठी ७५०० कोटींची तरतूद
– सरकारी रुग्णालयांत आग रोधक उपकरणे लावण्यात येतील.
– सिंधुदूर्ग, उस्मानाबाद, रायगड, साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालये उभारणार.
– कोरोना पार्श्वभूमीत औद्योगिक काळात घट झाली, मात्र बळीराजाने तारले. शेतमालाचा व्यवहार पारदर्शी करण्यासाठी शासन प्रयत्नात.
– शेतकऱ्यांना ३ लाख रुपये पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना आणि ज्यांनी हे कर्ज वेळेत भरले त्यांना बिनव्याजी कर्ज.
– कर्जमुक्तीनंतर ४२ हजार कोटी रुपयांचं पीक कर्ज शेतकऱ्यांना देण्यात आलं.
– कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी १५०० कोटींचा महावितरणला निधी.
– विकेल ते पिकेल योजनेला २१०० कोटी रुपये.
– कृषी संशोधनासाठी विद्यापीठांना दरवर्षी २०० कोटी रुपयांची तरतूद.
– जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांना १२ हजार ९१९ कोटींचा निधी.
– जलसंधारण विभागासाठी २ हजार ६० कोटींचा निधी प्रस्तावित.
– गोसीखुर्द प्रकल्पासाठी एक हजार कोटींची तरतूद, महत्वाच्या १२ धरणांच्या बळकटीसाठी ६२४ कोटी.
– ग्रामविकास विभागासाठी 7 हजार 350 कोटींचा निधी प्रस्तावित
– ईस्टर्न फ्री वे ला विलासराव देशमुख यांचे नाव.
– पुण्याच्या ८ पदरी रिंगरोडसाठी २४ हजार कोटी लागणार, यावर्षीपासून भूसंपादनाचे काम हाती घेतले जाईल.
– मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय असलेले रेवस-रेडी मार्गासाठी ९५७३ कोटींचा खर्च अपेक्षित.
– निसर्ग चक्रीवादळ आणि राज्यातील आपत्ती पाहून महाडमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची तुकडी कायमस्वरुपी ठेवण्यासाठी केंद्राकडे मागणी.
– एसटी महामंडळासाठी १४०० कोटीची घोषणा.
– पुणे, नगर, नाशिक २३५ किमीचा रेल्वे मार्ग उभारणार,१६१३९ कोटी मंजूर.
– नागपूर मेट्रो न्यू प्रकल्प हाती घेणार.
– ठाण्यात ७५०० कोटींचा वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प हाती घेणार.
– अहमदनगर,बीड, परळी, वर्ध्यात रेल्वेमार्गाचे काम वेगाने करणार.
– महाडमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाची तुकडी ठेवणार.
– आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी ११३१५ कोटी.
– समृद्धी महामार्गाचे काम ४४ टक्के पूर्ण झाले, ५०० किमीचा रस्ता १ मे ला खुला करणार.
– नांदेड ते जालना २०० किमीचा नवा मार्ग उभारणार.
– गोव्याला जाण्यासाठी ५४० किमीच्या समुद्री मार्गासाठी ९५४० कोटी.
– स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद.
– राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना, घर खरेदी करताना महिलेच्या नावाने घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देणार
– घरकुल योजनेसाठी ६८०० कोटीं, यातून गरिबांना हक्काचे घर मिळण्यास मदत होईल.
– जीर्ण अवस्थेत असलेल्या शाळांच्या पुनरुज्जीवनासाठी तीन हजार कोटीं.
– राज्यात ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना बसने मोफत प्रवास योजना.
– क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नावाने योजना,१५०० हायब्रीड बस देणार, मोठ्या शहरात तेजस्विनी योजनेत अधिक बस उपलब्ध करून देणार.
– शेती आणि शेतकरी यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील
– इमारतीसाठी ७३ कोटी. ससून रुग्णालयातील कर्मचारी निवासासाठी २८ कोटीची तरतूद.
– राज्यातील ११ परिचारिक प्रशिक्षण वर्गांचे महाविद्यालयात रुपांतर करणार.
– लातूरच्या रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण इमारतीसाठी ७३ कोटी.
– ससून रुग्णालयातील कर्मचारी निवासासाठी २८ कोटी रुपये मंजूर.
– मुंबईसाठी महत्वाच्या असलेल्या कोस्टल रोडचं काम २०२४ पूर्वी पूर्ण करण्याचा निर्धार.
– धूतपापेश्वर मंदीर, एकवीरा मंदीर, खंडोबा मंदीर, आनंदेश्वर, शिव मंदीरांचा विकास करणार.
– सिंधुदूर्ग, रत्नागिरीमध्ये पर्यटन, मस्त्य व्यवसाय, सूक्ष्म उद्योगांचा विकास करण्यासाठी सिंधुरत्न योजना. तीन वर्षांत ३०० कोटी निधी देणार.
– घरकाम करणाऱ्या महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी संत जनाबाई यांच्या नावाने योजना, त्यासाठी २५० कोटी रुपये बीजभांडवलाची तरतूद.
– महाज्योती, सारथी, बार्टी या संस्थांसाठी प्रत्येकी १५० कोटी उपलब्ध करून देण्यात येतील, MPSC च्या बळकटीकरणासाठी २ हजार कोटीची तरतूद.
– दहा हजार २२६ कोटी महसुली तूट, राजकोशीय तूट ६६ हजार कोटी.
– मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे ७०० किमी पैकी ५०० किमीचे काम पूर्ण.
– नागपूर ते शिर्डी मार्ग १ मे २०२१ रोजी मार्ग खुला करण्यात येणार.
– मद्यावरील कर वाढवला.
– अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलबाबत काहीही घोषणा नाही.

अर्थसंकल्प 2021-22 : जागतिक महिलादिनी सरकारचं मोठं ‘गिफ्ट’; महिलेच्या नावावर घर घेतल्यास…
शरद पवारांचा राज ठाकरेंना फोन ! नाणारबद्दल म्हणाले…
महिलांना ५० % आरक्षण दिलं पाहिजे; ‘या’ महिला खासदाराची राज्यसभेत मागणी
महिला दिन वर्षातून एकदाच का साजरा करायचा ? राज ठाकरेंची ‘ही’ पोस्ट व्हायरल
मराठा आरक्षणात अन्य राज्यांनाही पक्षकार करणार !

Related Posts