IMPIMP

Mumbai News : धक्कादायक कोरोनाची लस घेतल्यानंतर 65 वर्षीय वृद्धाचा अवघ्या दीड तासातच मृत्यू

by amol
 Thane News | maharashtra thane a man administered rabies vaccine instead of covid 19

मुंबई : – कोरोनाची लस Corona Vaccine घेतल्यानंतर गोरेगावमधील एका 65 वर्षीय वृद्धाचा दीड तासातच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईत अशाप्रकारचे हे पहिलेच प्रकरण आहे. दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य खात्याने लगेचच या व्यक्तीचा मृत्यू हा कोरोना लसीमुळे झाला असा संबंध जोडण्यास नकार दिला आहे.

गोरेगाव येथे राहणा-या एका 65 वर्षीय वृद्धाने सोमवारी (दि. 8) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जोगेश्वरीच्या मिल्लत नर्सिंग होममध्ये कोरोनाची लस Corona Vaccine घेतली. त्यांना सीरमच्या कोविशिल्ड लशीचा 0.5 मिलीचा डोस दिला होता. मात्र, त्यानंतर काही मिनिटांतच त्यांना भोवळ आल्याने ते खुर्चीवरून कोसळले. यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले होते. मात्र, लस घेतल्यानंतर अवघ्या दीड तासातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाशी संबंधित विकार असे गंभीर आजार होते, असे मुंबई पालिकेने सांगितले आहे. त्यांना कोरोना लस दिल्यानंतर अ‍ॅनाफिलेक्टिक शॉक बसल्याचे सध्या सांगू शकत नाही. लसीकरण समिती या घटनेची चौकशी करेल, त्यानंतरच काही सांगता येईल, असे पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

दरम्यान, कोरोना लस Corona Vaccine सुरक्षित असल्याचा दावा सरकार आणि कोरोना लस बनविणाऱ्या कंपन्या करत आहेत. गेल्या आठवड्यापासून ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस द्यायला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून राज्यातील नेते शरद पवार, सुप्रिया सुळे यांनीदेखील लस टोचून घेतली आहे. यामुळे अनेक नागरिकांनीही कोरोना लस टोचून घेण्यास पुढाकार घेतला आहे. मोठ्या प्रमाणावर यासाठी नोंदणी केली जात आहे. मात्र, अशा घटनांमुळे अनेकजण धास्तावण्याची शक्यता आहे.

अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर पार्थ पवारांचे ट्विट, म्हणाले…

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात गूढ वाढले, इनोव्हाबाबत नवीन माहिती समोर

Maratha Reservation : ‘अशोक चव्हाणांना मराठा आरक्षणांचं काहीही देणं-घेणं नाही’ : देवेंद्र फडणवीस

राजकारणातील प्रवेशाबाबत सौरव गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला…

Related Posts