IMPIMP

राजकारणातील प्रवेशाबाबत सौरव गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला…

by amol
bengal assembly elections sourav ganguly interview political entry let s see what happens next

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विविध पक्षांकडून प्रचार सभा घेतल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली Sourav Ganguly यांच्या राजकारणातील प्रवेशावर चर्चा सुरू होत्या. मात्र, सौरव गांगुली यांनी यावर भाष्य केले. ‘आता मी स्वस्थ आहे. आपल्या कामाला सुरुवात करत आहे’, असे तो म्हणाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकात्याच्या ब्रिगेड ग्राउंडवर एका प्रचार सभेला संबोधित केले होते. या सभेला सौरव गांगुली उपस्थित राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, तो या सभेत उपस्थित राहू शकला नाही. सौरव गांगुली म्हणाला, की आयुष्याने मला अनेक संधी दिल्या. बघूया पुढे काय होते. आता मी स्वस्थ आहे आणि आपल्या कामाला सुरुवात करत आहे. याशिवाय सौरव गांगुली Sourav Ganguly याने क्रिकेटसंबंधी अनेक मुद्यांवर भाष्य केले.

सौरव गांगुली भाजपमध्ये आला तर चांगलेच

सौरव गांगुली Sourav Ganguly संदर्भात येत असलेल्या बातम्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा दम नाही.
भाजप किंवा सौरव गांगुलीकडून अद्याप काहीही सांगितले गेले नाही.
सौरव गांगुली भाजपमध्ये आला तर चांगलेच आहे.
पक्षात जे कोणी येईल त्याचे आम्ही स्वागतच करू, असे पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी सांगितले.

अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर पार्थ पवारांचे ट्विट, म्हणाले…

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात गूढ वाढले, इनोव्हाबाबत नवीन माहिती समोर

Maratha Reservation : ‘अशोक चव्हाणांना मराठा आरक्षणांचं काहीही देणं-घेणं नाही’ : देवेंद्र फडणवीस

ममता बॅनर्जींना मोठा झटका ! 5 आमदारांनी केला ‘तृणमूल’ला रामराम

Related Posts