IMPIMP

BJP-MNS Alliance | ‘भाजप-मनसेला युती करण्याची गरज नाही, कारण…’, शिवसेना नेत्याचा मोठा दावा; राजकीय चर्चांना उधाण

by nagesh
BJP-MNS Alliance | shivsena leader and mla sachin ahir has made a big claim about bjp and mns alliance

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन BJP-MNS Alliance | महापालिका निवडणुकांच्या (Municipal Election) पार्श्वभूमीवर भाजप नते आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्यात भेटीगाठी वाढल्या आहेत. मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेतली. या भेटीमागचे कारण समजू शकले नसले तरी भाजप-मनसे युतीची (BJP-MNS Alliance) चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.

 

मुंबई महापालिका निवडणुकीत (Mumbai Municipal Election) मनसेबरोबर यावी, अशी भाजप नेत्यांची इच्छा असल्याचे बोलले जात आहे. परंतु याच दरम्यान शिवसेनेचे नेते सचिन अहिर (Shiv Sena Leader Sachin Ahir) यांनी भाजप-मनसे युतीबाबत (BJP-MNS Alliance) मोठा दावा केला आहे. भाजप आणि मनसेला युती करण्याची गरज नाही, कारण आधीच दोघांची छुपी युती झाली आहे. त्याला सामना करण्याची ताकद शिवसेनेत आहे. मनसे ज्यांच्यासाठी भोंगा वाजवत होते, त्यांना आता मनसेची गरज लागत नाही. त्यामुळे विनोद तावडे (Vinod Tawde), आशिष शेलार (Ashish Shelar) हे राज ठाकरे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेत आहेत, असा गौप्यस्फोट अहिर यांनी केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती.
दीड महिन्यात राज ठाकरे आणि फडणवीस यांची दुसरी भेट आहे.
मागील महिन्यात फडणवीस हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थावर (Shivtirtha) पोहचले होते.
सोमवारी भाजपचे विनोद तावडे, यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.
राज ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट असल्याचे त्यांनी सांगितले होते.

 

Web Title :- BJP-MNS Alliance | shivsena leader and mla sachin ahir has made a big claim about bjp and mns alliance

 

हे देखील वाचा :

SSY | व्याजदर वाढण्यापूर्वी सुकन्या समृद्धीमध्ये झाले 5 बदल, पैसे जमा करणार्‍यांनी जाणून घ्यावे

Ganeshotsav 2022 | राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना 5 लाखांचा पुरस्कार, राज्य सरकारची घोषणा

विना आधार नंबर डाऊनलोड करा E-Aadhaar, फक्त करावे लागेल हे काम

 

Related Posts