IMPIMP

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात साधारण वाढ; जाणून घ्या आजचे दर

by nagesh
Gold Price Today | gold rate price today on 9 november 2021 forecast outlook silver price rate today

मुंबई :सरकारसत्ता ऑनलाइन – Gold Price Today | मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. दिवाळीसणा आगोदर सोन्याच्या किंमती (Gold Price Today) घसरताना दिसल्या. त्याचबरोबर दिवाळीमध्ये देखील सोने आणि चांदीच्या किंमती कमीच होत्या. आज (मंगळवारी) सोन्याच्या दरात साधारण वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. तसेच चांदीही वधारली आहे. काल (सोमवारी) तुलनेत आजचा सोन्याचा भाव वधारला आहे. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा (Gold) दर 47,030 रुपये पर्यंत पोहचला आहे. तर, चांदीची किंमत (Silver) 64,800 रुपये प्रति किलो पर्यंत पोहचली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

भारतीय सराफा बाजारात आणि आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price) गेल्या काही दिवसांपासून घट होताना दिसत आहे. मागील काही काळ सोन्याच्या दरात घसरण झाल्याने सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसली. त्यामुळे सराफा व्यावसायिक देखील आनंदीत होते. पंरतु आज सोने आणि चांदीच्या दरात साधारण वाढ झाली आहे.

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. त्याचबरोबर, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. (Gold Price Today)

 

 

आजचे सोन्याचे दर (Gold Price Today) –

 

 

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा दर – 46,280 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 49,520 रुपये

 

 

मुंबई –

24 कॅरेट सोन्याचा दर – 47,030 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 48,030 रुपये

 

 

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा दर – 47,030 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 48,030 रुपये

आजचा चांदीचा भाव – 64,800 रुपये.

 

Web Title: Gold Price Today | gold rate price today on 9 november 2021 forecast outlook silver price rate today

 

हे देखील वाचा :

Modi Government | मोदी सरकारकडून पेन्शनर्ससाठी मोठी खुशखबर ! Pension च्या वाढीवर लवकरच निर्णय

Whatsapp Verification ID | बदलणार आहे का Whatsapp? जर दिला नाही ऑफिशियल आयडी तर ब्लॉक होईल अकाऊंट

Anti Corruption Bureau Mumbai | 3 लाखाच्या लाच प्रकरणी नवी मुंबई महापालिकेतील लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

 

Related Posts