IMPIMP

Maharashtra Police | जबरी चोरी अन् खंडणी प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर FIR, राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ

by nagesh
Police Bharati | transgender can also apply online for the post of police constable

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Police | कारवाई करण्याच्या नावाखील अंगडीयाचा व्यापार करणाऱ्यांना आयकर विभागाची
(Income Tax Department) भीती दाखवून पोलिसांनी पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात (Lokmanya Tilak Marg Police Station) घडला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (Police Inspector), सहायक पोलीस निरीक्षक (API), पोलीस उपनिरीक्षक (PSI) यांच्यावर लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात आज (शनिवार) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. तीन पोलिसांविरुद्ध पैसे उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. (Maharashtra Police)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पोलीस निरीक्षक ओम वंगाटे (Police Inspector Om Wangate), सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम (API Nitin Kadam), पोलीस उपनिरीक्षक समाधान जमदाडे (PSI Samadhan Jamdade) यांच्यासह इतरांवर लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता 1860 चे अधिनियमांतर्गत कलम 392, 384,341,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग मुंबई दिलीप रघुनाथ सावंत Addl CP, South Regional Division Mumbai Dilip Raghunath Sawant (वय-57) यांनी फिर्याद दिली आहे. (Maharashtra Police)

 

अपर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग दिलीप सावंत यांच्या अंतर्गत 18 पोलीस स्टेशन येतात. 7 डिसेंबर 2021 रोजी मुंबईतील भुलेश्वर (Bhuleshwar) येथील अंगडीया असोसिएशनचे (Angadia Association) योगेशभाई गांधी (Yogeshbhai Gandhi), जतीन शहा (Jatin Shah), मधुसूदन रावल (Madhusudan Rawal), मनगनभाई प्रजापती (Manganbhai Prajapati) यांनी दिलीप सावंत यांची भेट घेऊन लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि अमंलदार यांच्याकडून होणाऱ्या त्रासाबाबत लेखी तक्रार दिली होती. त्यामध्ये त्यांनी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी पोफळवाडी परिसरात ज्यांच्या बॅगेत पैसे असतील त्यांना मुंबादेवी पोलीस चौकीत (Mumbadevi Police Chowki) नेऊन पैसे उकळल्याची तक्रार दिली होती. तसेच यामध्ये पोलीस निरीक्षक वंगाटे यांच्या नावाचा उल्लेख केला होता.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दिलीप सावंत यांनी पोलीस सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था (Joint CP Law and Order) यांच्या मार्फत पोलीस आयुक्त बृहन्मुंबई (Brihanmumbai CP) यांच्याकडे टिपणी सादर केली.
यावर पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार पैसे घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचे जबाब नोंदवण्यात आले.
तसेच लो. टि. मार्ग पोलीस ठाण्यातील प्रवेशद्वार व ठाणे अंमलदार कक्षातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.

 

प्राथमिक तपासात पोलीस निरीक्षक ओम वंगाटे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम, पोलीस उपनिरीक्षक समाधान जमदाडे व इतर अंमलदार यांनी 2,3,4 व 6 डिसेंबर 2021 रोजी पोफळवाडी परिसरातील अंगडीया व्यापार करणाऱ्यांना आयकर विभागाची भीती दाखवून पैसे उकळल्याचे निष्पन्न झाले.
तसेच पोलिसांची वागणूक आणि पोलीस ठाण्यातील नोंदी यामध्ये तफावत आढळून आली.
तसेच पोलीस निरीक्षक वंगाटे यांच्या आदेशानुसार कारवाई केल्याचे सहायक पोलीस निरीक्षक कदम आणि पोलीस उपनिरीक्षक जमदाडे यांनी त्यांच्या जबाबात सांगितले.

 

एकंदरीत केलेल्या चौकशीमध्ये 2, 3, 4 व 6 डिसेंबर 2021 या दिवशी पोलीस निरीक्षक ओम वंगाटे,
सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम, पोलीस उपनिरीक्षक समाधान जमदाडे व इतरांनी पोफळवाडी परिसरात संशयितांवर कारवाई करण्याच्या नावाखाली अंगडीया व्यापार करणाऱ्यांना बेकायदेशीररित्या अटकाव करुन त्यांच्या व्यवहाराची माहिती आयकर विभागाला देण्याची भीती घालून त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे उकळल्याचे निष्पन्न झाले.
तिघांवर लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Maharashtra Police | FIR against Senior Inspector of Police Assistant Inspector of Police Sub Inspector of Police in extortion case

 

हे देखील वाचा :

Maharashtra Police | ‘वसुली’ प्रकरणात 2 ‘बड्या’ पोलिस अधिकार्‍यांना अटक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक फरार; राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ

Chitra Wagh | ‘महाराज असते तर कडेलोट केला असता या सरकारचा’; भाजपच्या कार्यक्रमाला गेल्याने शिवसेनेच्या आमदाराची भाऊजयला मारहाण !

Narayan Rane | ‘दुसरा कोणी असता तर पदावर बसला नसता’; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

 

Related Posts