IMPIMP

BSF Officer | बीएसएफ अधिकाऱ्याकडे मिळालं घबाड ! 14 कोटी रोख, दागिने आणि 7 महागड्या गाड्या

by nagesh
BSF Officer | 14 crores luxury cars seized from bsf officer behind 125 crore fraud

सरकारसत्ता ऑनलाइन – BSF Officer | हरियाणामधील सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याकडे आयपीएस (IPS Officer) असल्याचे भासवून लोकांची
फसवणूक करून १२५ कोटींची मालमत्ता केल्याचे समोर आले. प्रवीण यादव असं या अधिकाऱ्याचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
महत्त्वाचे म्हणजे तपासात त्याच्याकडे तब्बल १४ कोटींची रोख रक्कम, दागिने आणि सात महागड्या गाड्या सापडल्या. या गाड्यांमध्ये बीएमडब्ल्यू, जीप
आणि मर्सिडीजचाही समावेश आहे. दरम्यान पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याच्या कारणावरून प्रवीण यादव यांची पत्नी ममता यादव, बहिण रितू आणि सहकाऱ्यालाही बेड्या ठोकल्या आहेत. (BSF Officer)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

गुरुग्राम पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस आयुक्त (क्राइम) प्रीतपाल सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण यादव हे गुरुग्राम येथील मानेसरमधील राष्ट्रीय सुरक्षा रक्षक मुख्यालयात डेप्युटी कमांडंट म्हणून कार्यरत होते. यादव यांनी लोंकाना आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून राष्ट्रीय सुरक्षा रक्षक मुख्यालयाच्या परिसरात बांधकामाचं कंत्राट मिळवून देण्याचं आश्वासन देत कोट्यावधी रुपये घेतले होते. हे पैसे अँक्सिस बँकेत मॅनेजर असलेली बहीण रितू यादव हिच्यामार्फत एनएसजीच्या नावे सुरु केलेल्या खोट्या खात्यात जमा केले होते.

 

शेअर बाजारात ६० लाखांच नुकसान झाल्याने प्रवीण यादव यांनी लोकांची फसवणूक करत हा सगळा पैसा मिळवण्याचा कट आखला होता. दरम्यान, अगरताला येथे प्रवीण यादव यांना पोस्टिंग मिळाली होती. पण मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा झाल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला होता. (BSF Officer)

 

Web Title : BSF Officer | 14 crores luxury cars seized from bsf officer behind 125 crore fraud

 

हे देखील वाचा :

EPFO Withdraw Rule | पीएफ सदस्य दुसर्‍यांदा सुद्धा काढू शकतात कोविड अ‍ॅडव्हान्स, जाणून घ्या काय आहे पद्धत?

Multibagger Stock | 25 रुपयांच्या ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने 1 लाख रुपयांचे 2 वर्षांत केले 30 लाख रुपये, जाणून घेवूयात एका दृष्टीक्षेपात

Personal Loan | कामाची बातमी ! पहिल्यांदा घेत असाल पर्सनल लोन तर ‘या’ 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा; जाणून घ्या

 

Related Posts