IMPIMP

Parambir Singh | केंद्राच्या मदतीनं परमबीर सिंह यांचा शोध सुरु, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

by nagesh
Parambir Singh | process for parmbir singh suspension is underway says maharashtra home minister dilip wales patil

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) हे सध्या बेपत्ता असल्याचे समजतेय. मागील काही दिवसांपासून परमबीर सिंह (Parambir Singh) हे नेमके कोठे आहेत याची कोणालाच माहिती नाही. त्यांचा संपर्क होत नसून तपास यंत्रणा त्यांचा शोध घेत आहेत. याच दरम्यान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी देखील परमबीर सिंह हे परदेशात (Abroad) पळून गेले असतील तर ते गंभीर असल्याचे सांगितले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या (Union Home Ministry) मदतीने आम्ही परमबीर सिंह यांचा शोध घेत आहोत, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

तपास यंत्रणांना संशय आहे की, परमबीर सिंह (Parambir Singh) हे युरोपियन देशांत (European countries) गेले आहेत.
यावर बोलताना वळसे पाटील म्हणाले, परमबीर सिंह हे एक सरकारी अधिकारी असून देशाबाहेर जायच्या आधी सरकारची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
गृहमंत्रालयाच्या मदतीने आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. ते जर देशाबाहेर गेले असतील तर हे योग्य नाही.
मंत्री किंवा अधिकारी कोणीही असेल तर त्यांना परवानगी घेतल्याशिवाय देशाबाहेर जात येत नाही.
त्यांचं इथे असणं गरजेचं आहे, त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले होते, त्याचा हिशोब करायचा आहे.
परंतु आम्ही कोणावरही जाणीवपूर्वक कुणाच्या मागे लागून करावाई करणार नाही, हा सगळा रुटीन कारवाईचा भाग असल्याचे वळसे पाटील म्हणाले.

 

 

दरम्यान, परमबीर सिंह यांना राज्य सरकारने अनेक वेळा कळवले आहे कोणताही कर्मचारी आजारपणाच्या रजेवर (sick leave) जातो त्यावेळी त्याचं निवास स्थळ आणि ठिकाण हे राज्य सरकारला (State Government) कळवणे आवश्यक आहे.
मात्र, या प्रकरणात त्यांनी तसं काही केलेलं नाही. त्यामुळे आम्ही आता त्या दृष्टीकोनातून पावले टाकत आहोत,
अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

 

 

Web Title :- Parambir Singh | Search for Parambir Singh begins with the help of central government, Home Minister Dilip Walse Patil informed

 

हे देखील वाचा :

Pune accident | दुर्देवी ! शिक्रापूर-चाकण रस्त्यावर भीषण अपघात; आई-वडिलांसह 7 महिन्याच्या बाळाला कंटेनरने चिरडले

’आपले कायदा मंत्री चांगले डान्सर सुद्धा आहेत’, किरण रिजिजू यांचा डान्स पाहून फॅन झाले PM Modi, असे केले कौतूक (व्हिडीओ)

MP Accident News | बस आणि कंटेनरच्या भीषण अपघातात 7 जण जागीच ठार, 13 जखमी

 

Related Posts