IMPIMP

Prakash Ambedkar On Sanjay Raut | संजय तुम्ही किती खोटं बोलणार आहात?, सहकारी असूनही पाठीत खंजीर खुपसला, माझ्याविरोधात…, प्रकाश आंबेडकरांचा आरोप

by sachinsitapure

मुंबई : Prakash Ambedkar On Sanjay Raut | मविआ नेत्यांनाच (Mahavikas Aghadi) आम्हाला सोबत घेण्यास विरोध असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) यावेळी अनेकदा केला आहे. मात्र, आता स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर पोस्ट करून मविआच्या नेत्यांवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक (Silver Oak Mumbai) निवासस्थानी झालेल्या बैठकीचा उल्लेख करत आंबेडकर यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, संजय तुम्ही किती खोटं बोलणार आहात? मुंबईतील फोर सीजन्स हॉटेल येथे ६ मार्च रोजी झालेल्या बैठकीनंतर इतर कोणत्याही बैठकीला तुम्ही आमच्या प्रतिनिधीला आमंत्रित का केले नाही? आताही तुम्ही वंचितला आमंत्रित न करता का बैठका घेता? तुम्ही तर सहकारी असूनही पाठीत खंजीर खुपसला.

पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकीत तुम्ही काय भूमिका घेतली, हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही आमच्याविरोधात अकोला येथे उमेदवार देण्याचा प्रस्ताव ठेवला? हे कसले नाते बनवू पाहात आहात आपण? एका बाजूला आघाडीचे आमिष दाखवायचे आणि दुसरीकडे आम्हाला पाडण्यासाठी कट रचायचा. असे विचार आहेत तुमचे? प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या या आरोपांना संजय राऊत कोणते उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Pune Crime News | पुणे : अश्लील मेसेज करुन मेहुणीचा विनयभंग, गुन्हा दाखल

Related Posts