IMPIMP

Rebel MLA Santosh Bangar | बंडखोर आमदार संतोष बांगर यांच्या इशाऱ्याला शिवसैनिक तरुणीचं प्रत्युत्तर, म्हणाली- ‘मला धमक्या फक्त बांगरांकडूनच नाही तर…’

by nagesh
Rebel MLA Santosh Bangar shivsena ayodhya pol slams rebel mla santosh bangar eknath shinde group

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळलं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार स्थापन झाले. परंतु, यानंतर एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या बंडखोर आमदारांना ‘गद्दार’ म्हणून अनेक शिवसैनिकांकडून संभावना केली जाऊ लागली. या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार संतोष बांगर (Rebel MLA Santosh Bangar) यांनी ‘गद्दार म्हणू नका, नाहीतर आमचे शिवसैनिक कानाखाली आवाज काढल्याशिवाय राहणार नाहीत.’ असं विधान संतोष बांगर (Rebel MLA Santosh Bangar) यांनी केले. आता त्याचे पडसाद उमटू लागले असून शिवसेनेच्या (Shivsena) समाजमाध्यम समन्वयक अयोध्या पोळ – पाटील (Ayodhya Pol-Patil) यांनी बांगर यांना प्रत्युत्तर दिले आहे.

 

काय म्हणाले संतोष बांगर ?

सुरुवातीच्या काळात बंडखोरांवर टीका करणारे संतोष बांगर (Rebel MLA Santosh Bangar) नंतर स्वत:च शिंदे गटात (Shinde Group) सामील झाले. यावरुन टीका करणाऱ्यांवर शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना तोंडसुख घेतले. आपण शिवसैनिक आहोत. जर आपल्याला कुणी गद्दार म्हणत असेल तर त्याच्या कानाखाली आवाज काढण्याचं काम माझ्या शिवसैनिकांनी करावं. आम्ही भिणारे शिवसैनिक (Shiv Sainik) नाही. आमच्या हातात बांगड्या नाहीत. आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत. आम्हाला जर कोणी आरे म्हटलं तर त्याला कारे नाही, पण कानाखाली आवाज काढल्याशिवाय राहणार नाही, असं बांगर म्हणाले होते.

 

तेव्हा मला भायखळ्यातून धमकीचे फोन आले

संतोष बांगर यांच्या वक्तव्यावर एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना शिवसेना समाजमाध्यम समन्वयक (Shivsena Social Media Coordinator) अयोध्या पोळ-पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या ‘ते म्हणत आहेत की आम्हाला गद्दार, बंडखोर म्हणायचं नाही. जर असं कुणी म्हणत असेल, तर आमचे शिवसैनिक त्यांच्या कानाखाली आवाज काढतील. पण मला धमक्या (Threats) फक्त बांगरांकडूनच नाही तर स्थानिक आमदारांकडूनही आल्या आहेत. मी जेव्हा बालाजी कल्याणकर (Balaji Kalyankar) यांचे नाव घेऊन पोस्ट लिहिल्या, तेव्हा मला भायखळ्यातून (Byculla) फोन आले. तुम्ही आमच्या मॅडमबद्दल लिहायचं नाही असं सांगितलं गेलं. मी तर तोपर्यंत सुरुवातही केली नव्हती. पण मला करु नको म्हटलं तरी मी ते सगळ्यात आधी करते.’

 

करुन करुन काय करतील ? हातपाय तोडतील

आपण धमक्यांना बळी पडणार नसल्याचे अयोध्या पोळ-पाटील यांनी यावेळी सांगितले. करुन करुन काय करतील ? हातपाय तोडतील किंवा जीव घेतील. माझे आई – वडील अभिमानाने म्हणतील की मुलीनं शिवसेनेसाठी स्वत:चा जीव दिला. माझ्यासारखी लकी कुणीच नसेल. कारण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अशा गोष्टींना बळी न पडलेल्यांची नावं घेतील, तेव्हा माझं नाव घेतील. मी अशा धमक्यांना घाबरणारी नाही, अस त्या म्हणाल्या.

 

भायखळ्यातून धमक्या आल्या

मला भायखळ्यातून धमक्या आल्या, तेव्हा मी सेनाभवनाला गेले होते.
तेव्हा मी आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) कानावर ही गोष्ट घातली. माझी उद्धव ठाकरेंसोबतही बैठक झाली.
तेव्हाही मी त्यांना ही बाब सांगितली. जीव गेला तरी बेहत्तर, पण मी पक्षाची बाजू मांडायचं सोडणार नाही,
असा निर्धार अयोध्या यांनी व्यक्त केला.

 

Web Title :- Rebel MLA Santosh Bangar | shivsena ayodhya pol slams rebel mla santosh bangar eknath shinde group

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

 

 

Related Posts