IMPIMP

श्रीगोंद्यातील ज्येष्ठ नेते सदाशिव उर्फ सदाअण्णा पाचपुते यांचे निधन

by sikandershaikh
sadaanna-pachpute

श्रीगोंदा : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)श्रीगोंदा तालुक्यातील ज्येष्ठ राजकीय नेते सदाशिव उर्फ सदाअण्णा भिकाजी पाचपुते (sadaanna pachpute) यांचे आज (शुक्रवार) दुपारी निधन झाले. मागील तीन आठवड्यापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

सदाअण्णा पाचपुते (sadaanna pachpute) हे काष्टी जिल्हा परिषद गटाचे सदस्य साईकृपा उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि आमदार बबनराव पाचपुते यांचे बंधू होते. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. मात्र, अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

तालुक्यातील राजकारणाची धुरा त्यांच्याच खांद्यावर होती. श्रीगोंदा तालुक्यातील राजकारणातील ते किंग मेकर होते. बबनराव पाचपुते यांच्या राजकारणाचे ते आधारवड होते. तालुक्यात त्यांचा चांगला दबदबा होता. सदाशिव पाचपुते यांच्या निधनाचे वृत्त समजताच श्रीगोंदा तालुक्यात शोककळा पसरली आहे.
सदाशिव पाचपुते यांच्या मागे पत्नी, तीन भाऊ, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

लग्न करण्यासाठी घरातून पळाल्या दोन मैत्रीणी, एक पोहचली तरुंगात अन्…

Bhandara fire case : भंडारा दुर्घटनेप्रकरणी 40 दिवसानंतर 2 नर्सवर FIR दाखल

धक्कादायक ! पत्नीचा निर्घृण खून करून पतीचीही गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव : राम मंदिरासाठी अवैधरित्या ‘वर्गणी’ची वसूली, FIR  दाखल  

कोल्हापूर : वडगावचे माजी नगरसेवक आर. डी. पाटील यांचे निधन

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Related Posts