IMPIMP

गृहखात्यानंतर आता महसूल खाते भाजपच्या ‘रडार’वर, विखे-पाटलांनी केलं थोरातांच्या खात्याबाबत सूचक वक्तव्य

by pranjalishirish
bjp mp sujay vikhe patil targets revenue department for backing sand mafia

अहमदनगर : राज्यातील विविध मुद्यांवरून ठाकरे सरकारवर विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे. त्यानंतर आता भाजपचे BJP ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि त्यांचे खासदार पुत्र डॉ. सुजय विखे यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. गृह खात्यानंतर महसूल विभागात सुरु असलेला गैरप्रकार उघडकीस आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संतापलेल्या भाजप खासदार बाबुल सुप्रियोंनी थेट कार्यकर्त्यांच्या श्रीमुखात लगावली, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचा ‘लेटरबॉम्ब’ त्यानंतर रश्मी शुक्ला यांच्यासंदर्भातील फोन टॅपिंगचा प्रकार या सर्व घटनांमुळे राज्य सरकारवर टीका केली जात होती. तसेच गृह खात्याला किंबहुना गृहमंत्री अनिल देशमुख यांना सातत्याने कोंडीत पडकण्याचे काम केले जात होते. त्यानंतर आता महसूल विभागावर भाजपची BJP करडी नजर असल्याचे दिसत आहे. त्यावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ‘राज्यात सध्या माफियाराज सुरू आहे. जिल्ह्यात आणि राज्यातही वाळू व्यावसायिकांनी उच्छाद मांडला आहे. बेसुमार वाळू उपशामुळे नदीपात्र उद्ध्वस्त झाली आहेत. नेत्यांनी वाळू माफियांना पोसायचे आणि त्या माफियांनी गावपुढारी आणि गुन्हेगार पोसायचे अशी पद्धती सुरू आहे. त्यातून वाढलेल्या गुन्हेगारीचा जनतेला त्रास होत असूनही सरकार ठोस पावले उचलण्यास तयार नाही’.

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

महसूल विभागाचेही भांडे फुटणार : डॉ. विखे

खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले, ‘राज्यात गृह विभागाचे शंभर कोटींच्या वसुलीचे भांडे फुटले. आता महसूल विभागाचेही बदल्यांमध्ये भांडे फुटणार आहे. महसूल खात्‍याने आणलेल्या माती मिश्रीत वाळूच्‍या फंड्याचाही आपण लवकरच पर्दाफाश करणार आहोत. राज्यात सहकारी साखर कारखाने मोडीत काढून खासगीकरण करण्याचा डाव सुरू आहे. मात्र, जोपर्यंत विखे पाटील घराणे राजकारणात आहे, तोपर्यंत नगर जिल्ह्यात हे प्रयत्न यशस्वी होऊ दिले जाणार नाहीत’.

Also Read

जाणून घ्या : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी दिलेले समाधान आवताडे यांच्याबद्दल

खासदार नवनीत राणांचा विनामास्क ‘कोरकू’ डान्स तुफान व्हायरल !

शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

निवृत्त न्यायमूर्तींकडून ‘त्या’ प्रकरणाची चौकशी करण्यात येणार !

माजी खासदाराचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला, म्हणाले – ‘महाराष्ट्राची वाट लावू नका’

Sanjay Raut : … म्हणून 12 आमदारांची अद्याप नियुक्ती नाही

वसुलीच्या आरोपावरून आपल्याच लोकांकडून मिळाला घरचा ‘आहेर’ ! अनिल देशमुख म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांकडे केली होती मागणी, सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून केली जावी चौकशी’

Mann ki Baat : ‘देशाने वाजवलेल्या टाळ्या आणि थाळ्या कोरोना योद्ध्यांच्या हृदयाला स्पर्श करुन गेल्या’

‘होळीवर बंदी अन् शब-ए-बारातला परवानगी, राज्यात सरकार उद्धव ठकारेंचं आहे की, मुस्लिम लीगचं?’

Related Posts