IMPIMP

Deepak Kesarkar | अनुसूचित जमाती प्रवर्गाची भरती प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने राबविणार, दीपक केसरकर यांची विधानपरिषदेत माहिती

by nagesh
Deepak Kesarkar | The recruitment process of Scheduled Tribes category will be implemented in a time-bound manner, informed Deepak Kesarkar in the Legislative Council

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन   अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या आधारे शासकीय सेवेत दाखल झालेल्या आणि त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या उमेदवारांना अधिसंख्य पदावर कायम ठेवले आहे. यामध्ये आदिवासी उमेदवारावर कोणताही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊन त्यांना त्वरित न्याय मिळावा म्हणून रिक्त पदे भरतीसाठी कालबद्ध पद्धतीने भरती प्रक्रिया तातडीने राबवणार असल्याची माहिती दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी विधानपरिषदेत दिली. अनुसूचित जमाती प्रवर्गातील जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या उमेदवारांना अधिसंख्य पदावर घेतल्याबाबत सदस्य आमश्या पाडवी (Diarrhea Padvi) यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, लक्षवेधीला उत्तर देताना दीपक केसरकर (Deepak Kesarkar) बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितले की, जात पडताळणीत अवैध ठरलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील 3 हजार 898 उमेदवारांना राज्य शासनाने अधिसंख्य पदावर घेतले आहे. त्यांना पदोन्नती देण्यात येत नसल्याने बिंदूनामावलीत त्यांचा समावेश करता येत नाही. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिसंख्य पदावर वर्ग केल्याने रिक्त होणाऱ्या पदांसाठी विशेष भरती मोहीम राबविण्यात येणार आहे. ही अनुसूचित जमाती प्रवर्गाची भरती प्रक्रिया कालबद्ध कार्यक्रम आखून सेवा प्रवेश नियमानुसार राबविण्यात येणार आहे.

 

राज्य शासनाने 75 हजार पदभरतीची कार्यवाही सुरू केली असून यामध्येही अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना सामावून घेतले जाणार आहे. यामुळे आदिवासी समाजातील उमेदवारांची मोठ्या प्रमाणात संधी मिळणार आहे. सध्या रिक्त असलेल्या पदांमधील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अखत्यारीतल पदे भरण्याची कार्यवाही 31 डिसेंबर 2023 पर्यंत आणि गट क व गट ड मधील पदे भरण्याची प्रक्रिया 31 जुलै 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये आदिवासी समाजावर अन्याय होणार नाही याची ग्वाही केसरकर यांनी यावेळी दिली.

 

अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे ज्या शासकीय अधिकारी/ कर्मचारी
यांना अधिसंख्य पदावर वर्ग केले आहे अशा अधिकारी व कर्मचारी यांना सेवाविषयक तसेच
सेवा निवृत्तीचे लाभ देण्याचाही निर्णय घेतला आहे.
यामध्ये पदोन्नती व अनुकंपा धोरण याचा त्यांना लाभ मिळणार नाही.
तसेच, अधिसंख्य पदावर कार्यरत शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना मानवतावादी दृष्टीकोनातून व
त्यांनी केलेल्या सेवेचा विचार करुन एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन पुन्हा 11 महिन्यांच्या कालावधीसाठी
त्यांच्या सेवा निवृत्तीपर्यंत सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती केसरकर यांनी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जात पडताळणी कुटुंबातील एकाची किंवा वडिलांची असेल
तर कुटुंबातील इतर सदस्यांना जात पडताळणीबाबत योग्य निर्णय घेतला जाईल,
असे एका उपप्रश्नाला उत्तर देताना केसरकर यांनी सांगितले.

 

Web Title :- Deepak Kesarkar | The recruitment process of Scheduled Tribes category will be implemented in a time-bound manner, informed Deepak Kesarkar in the Legislative Council

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | लोकप्रतिनिधींनी मतदारसंघात कुटुंबप्रमुख म्हणूनच काम करावे- चंद्रकांत पाटील

Big Boss Season 16 | तिने खूप लोकांची घरे तोडण्याचा प्रयत्न केलाय; श्रीजिताचे टीना दत्तावर गंभीर आरोप…

Rohit Pawar | मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी केले आदित्य ठाकरेंवर आरोप; खासदार राहुल शेवाळेंच्या आरोपाला रोहित पवारांचे उत्तर

Malaika Arora | अरहान खानला वाटते आई मलायकापेक्षा ‘ही’ व्यक्ती अधिक जवळची…

 

Related Posts