IMPIMP

जाणून घ्या 3 जूनचे राशिफळ

by omkar
horoscope

सरकारसत्ता ऑनलाइन – मेष- 3 जून राशिफळ (Horoscope) : संमिश्र परिणामांचा दिवस आहे. कुटुंबात अनावश्यक खर्च वाढतील. सायंकाळ लहान मुलांसोबत घालवाल. लोकांशी भावनिक संबंध बनवाल, परंतु कुणीही उपयोगी पडणार नाही, नाराज व्हाल.

अ‍ॅलोपॅथीनंतरआता बाबा रामदेव यांचा ज्योतिषांवर निशाणा, म्हणाले…

विद्यार्थ्यांना आई-वडीलांचा आशीर्वाद मिळेल. कुटुंबात तणाव असू शकतो. कार्यक्षेत्रात सहकार्‍यांची साथ न मिळाल्याने जास्त मेहनत करावी लागेल.

वृषभ

दिवस उत्साह आणि आनंदाचा आहे. गोंधळाची स्थिती असूनही लाभाचा मार्ग सापडेल. मामाच्या बाजूकडून शुभवार्ता समजेल. कार्यक्षेत्रात नवीन बदलांमुळे वातावरण सकारात्मक राहील.

प्रयत्नातून कर्जमुक्ती होईल. सायंकाळी घरातील लोकांशी भविष्यातील योजनांवर चर्चा कराल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या.

 

मिथुन

दिवस आर्थिक बाबतीत प्रगतीचा आहे. पण तुमचे वागणे आणि उदासिनता लाभास हानीत बदलू शकते. सामाजिक संबंध बिघडू शकतात. बोलण्यात माधुर्य ठेवा. व्यापारात अचानक धनलाभ होईल.

मित्राच्या मदतीसाठी पुढे याल, ज्यामुळे समाधान मिळेल.(Horoscope)

 

कर्क

कोणत्याही कामासाठी जास्त धावपळ करावी लागणार नाही. सर्व कामे सहज होतील. व्यापारात लाभ होईल. राजकारणा झेंडा फडकेल. एखादी जुनी घटना आठवून दुखी व्हाल.

खर्च वाढल्याने बजेटमध्ये गडबड होईल. खर्च आणि उत्पन्नात संतुलन ठेवा. सायंकाळी जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकता.

सिंह

दिवस आर्थिक बाबतीत प्रगतीचा आहे. संपत्ती खरेदीसाठी दिवस उत्तम आहे. दाम्पत्य जीवन सुखी राहील. मेहनतीनंतर दुपारनंतर उत्पन्न वाढेल. व्यवहार चांगला असल्याने खर्च प्रमाणात राहतील.

धनवृद्धी होईल. नोकरीत वादात पडू नका.

कन्या

दिवस चांगले फळ देणारा आहे. जे काम हाती घ्याल त्यामध्ये यश मिळेल. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल, लाभ होईल. विद्यार्थ्यांना मेहनत करावी लागेल, तरच यश मिळेल.

आळस सोडा, अन्यथा कामात विघ्न येतील. आईशी वैचारिक मतभेद होतील, त्यांचे ऐका आणि वाद घालू नका.

तुळ

दिवस धन आणि सन्मान दोन्हीच्या प्राप्तीचा आहे. कोणतेही काम हाती घेतले तरी धावपळ करावी लागेल, पण अंतिम परिणाम चांगला असेल. कायदेशीर वाद संपेल.

अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी वेळ काढाल. संततीच्या विवाहातील अडचणी दूर होतील. घरात शुभकार्यावर चर्चा होईल.(Horoscope)

वृश्चिक

प्रत्येक कामात यश देणारा दिवस आहे, परंतु यासाठी मेहनत करावी लागेल. बेरोजगारांना काम मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबातील लोकांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी खर्च कराल.

सामाजिक क्षेत्रात मित्रांवर काही कामे सोपवाल. भाऊ किंवा बहिणीच्या विवाहाचा प्रस्ताव मंजूर होऊ शकतो

धनु

दिवस सामान्य आहे. मधुर व्यापारामुळे मित्रांची संख्या वाढेल. नवीन प्राजेक्ट सुरूहोऊ शकतो. पत्नी आणि मुलांसोबत वेळ घालवाल. कौटुंबिक तणाव दूर होईल. संपत्ती खरेदीसाठी दिवस उत्तम आहे.

विवाहासाठी उत्तम प्रस्ताव येतील. विद्यार्थी आज स्पर्धेसाठी अर्ज करू शकतात.

Also Read:- 

‘राजकारणात काहीही घडू शकतं’ ! राज ठाकरेंच्या विधानावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचार्‍याचे तडकाफडकी निलंबन

‘राज-उद्धव’ Shivsena एकत्र येतील काय? राज यांचे मार्मिक उत्तर, म्हणाले….

मोदी सरकारची 6 कोटी नोकरदारांना मोठं गिफ्ट ! पुढील महिन्यात PF खात्यात येतील जास्त पैसे, जाणून घ्या

Coronavirus : ‘या’ स्थितीत असतो हार्ट अटॅकचा धोका, जाणून घ्या

जाणून घ्या 2 जून राशीफळ !

Maggi बनवणाऱ्या कंपनीने केले मान्य, म्हणाले – ‘होय, आमचे 60 टक्क्यांहून अधिक प्रोडक्ट्स अनहेल्दी’

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम करण मेहराला अटक

Related Posts